शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

..असे आहेत नवे ‘जंबो’ गुरुजी

By admin | Published: June 25, 2016 2:48 AM

अनिल कुंबळे ज्यावेळी खेळाडू होते त्यावेळी ते खेळाची पूर्ण माहिती ठेवणारे, दृढसंकल्प असणारे आणि चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असलेले खेळाडू या गुणामुळे ओळखल्या जात होते

अनिल कुंबळे ज्यावेळी खेळाडू होते त्यावेळी ते खेळाची पूर्ण माहिती ठेवणारे, दृढसंकल्प असणारे आणि चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असलेले खेळाडू या गुणामुळे ओळखल्या जात होते. आता प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांना कोहली अँड कंपनीकडून तशाच प्रकारची कामगिरी अपेक्षित आहे. १९ वर्षांच्या अनिल कुंबळेने १९९० मध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी त्याच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली नव्हती. कारण त्याच लढतीत १७ वर्षीय एका खेळाडूने आपल्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांपैकी पहिले शतक झळकावले होते; पण पुढची दोन दशके भारतीय सचिन तेंडुलकरची मैदानावरील कामगिरीची प्रशंसा करीत असताना याच कालावधीत बेंगळुरूच्या सहा फूट तीन इंच उंची लाभलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरलाही पूर्ण आदर मिळाला. पराभूत संघाच्या कर्णधाराची देशातील मीडियाने प्रशंसा केली असे रोज घडत नाही. पण, २००८ मध्ये कुंबळेने २००८ मध्ये सिडनीमध्ये ‘मंकी गेट’ कसोटीनंतर पत्रकार परिषदेत ‘केवळ एक संघ खिलाडूवृत्तीने खेळला’ असे वक्तव्य केल्यानंतर हे घडले होते. त्यावेळी कर्णधाराने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली होती. त्या दिवसानंतर त्याच्याबाबतचा आदर आणखी वाढला. सांगायला व ऐकायला थोडे वेगळे वाटत असले तरी कुंबळे तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. सचिनमध्ये त्याच्यात अनोखी प्रतिभा नव्हती किंवा सौरव किंवा व्हीव्हीएसप्रमाणे तो ‘गॉड गिफ्टेड’ खेळाडू नव्हता; पण समर्पण, शिस्त आणि प्रतिबद्धतता याची चर्चा केली तर या तीन खेळाडूंच्या तुलनेत तो कुठेच कमी नव्हता.भागवत चंद्रशेखर यांच्या शहरातून आलेल्या या लेग स्पिनर अनिल कुंबळेवर सुरुवातीच्या कालावधीतच चेंडू अधिक वळवता येत नसल्याची टीका झाली; पण त्याने १८ वर्षांच्या कारकिर्दीत कसोटीमध्ये ६१९ तर वन-डेमध्ये ३३७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०९) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध फिरोजशाह कोटलावर त्याने ७४ धावांच्या मोबदल्यात घेतलेले १० बळी हा कुंबळेच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने जबडा तुटला असताना गोलंदाजी करीत ब्रायन लाराला बाद केले होते. त्यावरून त्याच्या समर्पणाची कल्पना येते. भारताचे दोन सर्वांत यशस्वी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन व सौरव गांगुली नेहमी या विनम्र व मृदुभाषी व्यक्तीचे आभारी राहतील. अनिलच्या उपस्थितीत त्यांना सामना जिंंकण्यासाठी कधी फिरकीपटूला अनुकूल खेळपट्टीचा गरज भासत नव्हती. तिसऱ्या दिवसांपासून चेंडू थोडाफार वळायला लागल्यानंतर उपखंडातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर कुंबळे उपयुक्त सिद्ध होत होता.प्रशिक्षक म्हणून कुंबळे कितपत यशस्वी ठरतो, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईलच; पण एक बाब मात्र स्पष्ट आहे ते म्हणजे त्याचे वर्तन. कुंबळेची रणनीती चांगली राहील, त्याचप्रमाणे त्याचे होमवर्कही अचूक असेल. त्याच्या उपस्थितीत कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही, हे मात्र निश्चित.