: आदिल सुमारीवालाचा
आयबाला सवाल
नवी दिल्ली : आशियाडमध्ये भारतीय पथकप्रमुख राहिलेले आणि बॉक्सर एल. सरितादेवी प्रकरणात अस्थायी निलंबनाची कारवाई सोसणारे आदिल सुमारीवाला यांनी मला निलंबित करणारे तुम्ही कोण, असा सवाल विश्व बॉक्सिंग संघटनेला (आयबा) केला आहे. स्वत:च्या अधिकार कक्षेबाहेर असलेले कृत्य आयबाने केले, असे सुमारीवाला यांचे मत आहे. आयबाने केलेल्या अस्थायी निलंबनाच्या कारवाईमुळे मुळीच विचलित नसल्याचे सांगून सुमारीवाला म्हणाले, ‘‘सरिताने आशियाडमध्ये रेफ्रीने आपल्यावर अन्याय केल्याच्या भावनेतून कांस्य स्वीकारण्यास नकार दिला. त्यावरून सरितासह कोच तसेच पथकप्रमुख या नात्याने माङयावर अस्थायी निलंबनाची कारवाई केली. मुळात आयबा मला निलंबित करूच शकत नाही. मी पथक प्रमुख या नात्याने इंचियोनला गेलो. पथकप्रमुख म्हणून देशाच्या मुष्टियुद्ध संघाची मी मदत केली. मला अस्थायीरीत्या निलंबित करणो आयबाच्या कार्यकक्षेत आणि अधिकारकक्षेत येत नाही. ’’
आयबाने निलंबनाच्या पद्धतीबद्दल जे कारण दिले त्यावर सुमारीवाला यांनी आश्चर्य व्यक्त केले. माङया निलंबनाचा अर्थ काय असा सवाल करीत ते पुढे म्हणाले, ‘भविष्यात मी कुठल्याही बॉक्सिंग स्पर्धेत अधिकारी या नात्याने उपस्थित राहणार नाही. त्यामुळे आयबाच्या निलंबनाची मला पर्वा नाही. मी याबाबत काही कारवाईदेखील करणार नाही. मी यासाठी आधी बोललो नाही कारण यामुळे सरितावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी भारताने सुरू ठेवलेल्या प्रय}ांवर पाणी फेरले गेले असते. पण अखेर मौन सोडावे लागले.
आयबाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. सरिता आणि अन्य कोचेस तसे करू शकतात. आयबाने माङयावर कुठले आरोप निश्चित केलेले नाहीत त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणो बंधनकारक नाही. तथाकथित निलंबनाची कारवाई केल्याचे अधिकृत पत्रदेखील मला मिळालेले नाही. यासंदर्भात आयओए, आयओसी आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.’ (वृत्तसंस्था)