शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

फायनलचे तिकीट कोणाला?

By admin | Published: March 24, 2015 1:02 AM

उपांत्य फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास उत्सुक असलेले न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान विश्वकप स्पर्धेत मंगळवारी पहिली उपांत्य लढत रंगणार आहे.

पहिली उपांत्य लढत : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका काट्याची टक्करआॅकलंड : उपांत्य फेरीतील पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यास उत्सुक असलेले न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान विश्वकप स्पर्धेत मंगळवारी पहिली उपांत्य लढत रंगणार आहे. उभय संघ अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. या निमित्ताने उभय संघांना इतिहास नोंदवण्याची संधी आहे. कारण, यापूर्वी न्यूझीलंडला कधीच अंतिम फेरी गाठता आली नाही; तर दक्षिण आफ्रिका संघ या क्रिकेट महाकुंभात कधीच फायनलसाठी पात्र ठरलेला नाही. न्यूझीलंडला यापूर्वी सहा वेळा विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर दक्षिण आफ्रिका संघाला तीनदा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. साखळी फेरीत एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीत मार्टिन गुप्तिलच्या आक्रमक द्विशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्ध सहज विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत सलग सात सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडतर्फे प्रत्येक लढतीत एक नवा खेळाडू ‘हिरो’ म्हणून पुढे आला आहे. गेल्या लढतीत ही भूमिका मार्टिन गुप्तिलने साकारली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद २३७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात विशेष अडचण आली नाही. पण दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मात्र त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिका संघात डेल स्टेन व मोर्ने मोर्कल यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. स्टेन व मोर्कल फॉर्मात असतील तर ते जगातील कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत.दरम्यान, न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले, ‘भूतकाळातील अपयशाला अधिक महत्त्व नसते, कारण दोन्ही संघ या स्पर्धेत शानदार कामगिरी करीत आहेत. आम्ही अंतिम फेरीत स्थान मिळविण्यास उत्सुक असून मंगळवारची लढत रंगतदार होईल. उभय संघ चांगला खेळ करीत असून उपांत्य लढतीत चुरस अनुभवाला मिळेल.’न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने याला टाचेच्या दुखापतीमुळे उपांत्य लढतीतून माघार घ्यावी लागली. मिल्नेची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याच्या स्थानी युवा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आलेला आहे. या विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणारी ही अखेरची लढत आहे. प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघही तुल्यबळ असून अन्य संघांच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. न्यूझीलंड संघावर मायदेशात खेळताना चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे राहणार आहे, पण कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलम मात्र याबाबत अधिक विचार करीत नाही. न्यूझीलंड संघाला कधीच प्रबळ दावेदार मानले गेलेले नाही, तर दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’च्या शिक्क्यासह खेळत आहे. दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य लढतीत विजय मिळविण्यात अपयश आले तर त्यांच्यावरील चोकर्सचा शिक्का कायम राहणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाला फॉर्मात असलेला कर्णधार एबी डिव्हिलियर्सकडून अधिक अपेक्षा आहेत. आघाडीच्या फळीची भिस्त हाशिम आमला व सूर गवसलेल्या क्विंटन डी कॉकच्या कामगिरीवर अवलंबून आहे. फाफ ड्यू प्लेसिसला या स्पर्धेत अद्याप छाप सोडता आलेली नसून त्याच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. पहिल्या उपांत्य लढतीतील विजेत्याबाबत भाकित वर्तवणे कठीण आहे. उभय संघांत दर्जेदार फलंदाज व अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे लढत रंगतदार होण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, केली एबोट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्ने मोर्कल, व्हेन पार्नेल, अ‍ॅरोन फांगिसो, वर्नन फिलँडर, रिली रोसेयू आणि डेल स्टेन.न्यूझीलंड : ब्रेन्डन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेन्ट बोल्ट, ग्रॅन्ट इलियट, मार्टिन गुप्तिल, टॉम लॅथम, मिशेल मॅक्लेघन, नॅथन मॅक्युलम, केली मिल्स, ल्युक रोंची, टीम साऊदी, रॉस टेलर, डॅनियल व्हेटोरी, केन विलियम्सन आणि मॅट हेन्री.