रियो दि जानेरो : फुटबॉल विश्वाचा सम्राट कोण, यासाठी महिनाभर सुरु असलेल्या रणसंग्रामाचा शेवट आता जवळ आला आहे. फुटबॉल विश्वातील इतिहास घडविण्यासाठी युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढय़ संघ समोरासमोर येत आहेत. थॉमस मुलरचा जर्मनीचा संघ आणि लियोनाल मेस्सीचा अर्जेटिना हे दोन संघ जेतेपदाचा मुकुट पटकावण्यास रविवारी रात्री रिओ दि जानेरोच्या माराकाना स्टेडियमवर झुंजणार आहेत.
आज घडणार इतिहास
1 केवळ ‘क्लब प्लेअर’ असा बसलेला शिक्का पुसण्यासाठी मेस्सीला अर्जेटिनाला विश्वविजेतेपद मिळवून द्यायचे आहे.
2मेस्सीचे हे स्वप्न मोडीत काढत अमेरिकन खंडात वर्ल्डकप जिंकणारा पहिला युरोपीय संघ म्हणवून घेण्यासाठी जर्मनीला विजेतेपद हवे आहे.
02 वेळा दोन्ही संघ फिफाच्या फायनलमध्ये भिडले आहेत. त्यात अर्जेटिना व जर्मनीने एकदा बाजी मारली आहे.
वेळा हे दोन्ही संघ विश्वचषकात आमने-सामने आले आहेत. त्यापैकी जर्मनीने दोन सामने जिंकले आहेत, तर दोन बरोबरीत सुटले आहेत. अर्जेटिनाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे फायनलमधील ही ‘फाइट’ ‘टफ’ असणार आहे.