शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

टी-२० चा बादशहा कोण?

By admin | Published: April 03, 2016 3:52 AM

महिनाभर गाजलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. जगातील सर्वोत्तम

कोलकाता : महिनाभर गाजलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. जगातील सर्वोत्तम संघांना नमवून अंतिम फेरीत दाखल झालेले हे दोन्ही संघ विश्व चॅम्पियन बनण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सज्ज झाले आहेत.जबर फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला सात गड्यांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत केले. भारताविरुद्ध लकी ठरलेल्या लेंडल सिमन्सकडून विंडीजला अंतिम सामन्यातही कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. विंडीज तसेच इंग्लंडला सुरुवातीला जेतेपदाच्या शर्यतीत कुणीही मोजले नव्हते. पण भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगला देश यापैकी कुणीही फायनलमध्ये पोहोचू शकले नाहीत. जेतेपदाच्या शर्यतीत सध्या विंडीजचे पारडे जड मानले जाते पण सत्य असे की उभय संघात ‘काट्याची टक्कर’ होईल. इंग्लंड गंभीरपणे खेळत असल्याने कॅरेबियन संघाला सावध रहावे लागेल. इंग्लंडने झटपट प्रकारात गेल्या वर्षभरात फारच सुधारणा घडवून आणली. विंडीजविरुद्ध पहिल्या पराभवानंतर त्यांचे डोळे उघडले. या संघाची धुरा ज्यो रुड आणि जेसन रॉय यांच्यासह कर्णधार मोर्गन यांच्यावर असेल. विंडीजच्या दिग्गज फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन आणि बेन स्टोक्स यांच्याकडे राहील. (वृत्तसंस्था)बलाबल...२०१० चा चॅम्पियन इंग्लंड आणि २०१२ चा चॅम्पियन वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ एकाच गटातून अंतिम फेरीत दाखल झाले हे विशेष. याआधी उभय संघात झालेल्या साखळी लढतीत कॅरेबियन संघाने बाजी मारली होती. फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार डेरेन सॅमीच्या विंडीज संघाला विजयाची पुनरावृत्ती करायचीय तर इंग्लंड बाजी उलटविण्यास आतूर आहे. इंग्लंडने संयमी खेळ करीत शांतपणे मोहीम पुढे राबविली हे देखील विशेष. २०१० मध्ये विंडीजच्या यजमानपदाखाली झालेल्या विश्वचषकात इंग्लंडने आॅस्ट्रेलियाचा सात गड्यांनंी पराभव करीत चषक जिंकला.विंडीजने २०१२ मध्ये लंकेच्या यजमानपदाखाली यजमान संघाला ३६ धावांनी पराभूत करीत चषक जिंकला होता. त्या संघाचा खेळाडू राहिलेल्या सॅमीकडे यंदा विंडीज संघाचे नेतृत्व आहे. या संघात ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सॅम्युअल बद्री,आंद्रे रसेल आणि जॉन्सन चार्ल्स हे मॅचविनर आहेत.

मॅचविनर्स...वेस्ट इंडिज : लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल, जॉन्सन चार्ल्स, डेरेन सॅमी, ड्वेन ब्राव्हो, सॅम्युअल बद्री.इंग्लंड: ज्यो रुट, जेसन रॉय, जोस बटलर, कर्णधार इयोन मोर्गन, अ‍ॅलेक्स हेल्स.

बेभरवशाचा गेल...ख्रिस गेलने सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध १०० धावा केल्या पण त्यानंतर तो दहा धावा काढण्यातही अनेकदा अपयशी ठरला आहे. तो एकट्याच्या बळावर सामना जिंकून देऊ शकतो पण कधी पहिल्या चेंडूवरही बाद होऊन जातो. चौकार, षटकारांचा हा बादशाह आतापर्यंत केवळ ११ षटकार व सात चौकार मारण्यात यशस्वी ठरला आहे.

खेळाडू काळी फित लावणारकोलकाता: टी-२० विश्वचषकाच्या महिला आणि पुरुषांच्या अंतिम सामन्यात सर्व खेळाडू आज रविवारी ईडन गार्डनवर काळी फित लावून खेळणार आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याने ही माहिती दिली. उड्डाणपूल कोसळल्याने मृत्युमुखी पडलेल्यांप्रती श्रद्धांजली म्हणून खेळाडू दंडावर काळ्या फिती लावतील. गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला तर शंभरावर लोक जखमी झाले होते. संघ यातून निवडणार वेस्ट इंडिज : डेरेन सॅमी (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, मर्लोन सॅम्युअल्स, लेंडल सिमन्स, आंद्रे रसेल, दिनेश रामदीन, ड्वेन ब्राव्हो, कार्लोस ब्रेथवेट, सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, जेसन होल्डर, जेरोम टेलर, एविन लुईस आणि अ‍ॅश्ले नर्स.इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन राय, जेम्स विन्स, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, लियॉम प्लंकेट, रीसी टोप्ले, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद आणि लियॉम डॉसन.सामन्याची वेळ सायं. ७.०० पासून. स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता