भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra)ने जगातील प्रत्येक मोठ्या ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पदकं जिंकले आहे. राष्ट्रकुल खेळ असो, आशियाई खेळ असो, जागतिक स्पर्धा असो की ऑलिम्पिक असो. नीरजने सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये तिरंगा फडकवला आहे. सध्या नीरज चोप्रा परदेशात राहतो आणि तिथे प्रशिक्षण घेण्यासोबतच विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. मात्र, आपल्या देशात परतताच नीरज एकदम भारतीय होऊन जातो. म्हणजे काय? तर, नीरज भारतात आल्यावर कोणत्याही कार्यक्रमात, पत्रकार परिषदेत किंवा मुलाखतीत इंग्रजीत बोलत नाही.
गेल्या काही वर्षांत असे अनेक प्रसंग आले आहेत, ज्यात नीरजने इंग्रजीत प्रश्न विचारणाऱ्यांना फटकारले आहे. 2018 मध्ये एकराम स्पोर्ट्स लिटररी फेस्टिव्हलमध्ये नीरजला पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी नीरजने त्याला मध्येच थांबवले आणि हिंदीत बोलायला सांगितले. याशिवाय, स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये स्टार अँकर जतीन सप्रूलाही नीरजने अडवले. जतिन नीरजला इंग्रजीत प्रश्न करत होता, त्यावर नीरजने 'हिंदीत प्रश्न विचारा' असे म्हटले. नीरजची हा एकदम देसी अंदाज चाहत्यांना खूप आवडतो.
यामुळे नीरज हिंदीत बोलतोएका मुलाखतीत नीरजला विचारण्यात आले की, तो इंग्रजीत का बोलत नाही? या प्रश्नावर नीरजने दिलेल्या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली. तो म्हणाला, 'मी अतिशय लहान गावातून आलो आहे. मी जे बोलतो ते त्यांनीही कळायला हवे. मी इंग्रजीत बोललो तर कोणाला काही कळणार नाही.' नीरजच्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.