शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

दक्षिणेचे आव्हान टिकणार?

By admin | Published: February 15, 2017 12:34 AM

मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेले दक्षिण विभाग संघ बुधवारी मुंबईमध्ये

मुंबई : मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेले दक्षिण विभाग संघ बुधवारी मुंबईमध्ये गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या पूर्व विभागाविरुध्द लढेल. यामध्ये बाजी मारत चार गुणांसह स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचे आव्हान दक्षिण विभागापुढे असेल.स्पर्धेत दक्षिण विभागाच्या नावावर अद्याप एकाही गुणाची नोंद झालेली नाही. त्याचवेळी, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी असलेल्या अनुक्रमे मध्य आणि उत्तर विभागाचा सामना दुपारी याच मैदानावर होईल. याआधी झालेल्या सामन्यात दक्षिण विभागाची गोलंदाजी पूर्व विभागाविरुध्द सपशेल अपयशी ठरली होती. त्यामुळे, बुधवारी पूर्व विभागाविरुध्द कामगिरी उंचावण्याचे दडपण दक्षिणच्या गोलंदाजांवर असेल. दरम्यान, चार संघांमध्ये पूर्व विभागाची धावगती सर्वश्रेष्ठ आहे. पूर्व विभागाने दोन सामन्यांमध्ये एक विजय व एक पराभव अशी कामगिरी केली आहे. दक्षिण विभाग १६ फेब्रुवारी यजमान व बलाढ्य पश्चिम विभागाविरुध्द भिडेल. त्याचवेळी, याचदिवशी दुसरा सामना उत्तर आणि पूर्व विभाग यांच्यामध्ये होईल. तसेच, १७ फेब्रुवारीला आणखी एका विश्रांतीनंतर, स्पर्धेच्या अंतिम दिवशी सकाळी पश्चिम विभागाचा सामना पूर्व विभागाविरुध्द होईल, तर अंतिम राऊंड रॉबिन सामना दक्षिण वि. मध्य असा रंगेल. (क्रीडा प्रतिनिधी)