नवी दिल्ली : पाच महिन्यांपासून जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे बरेच जलतरणपटू सरावापासून दूर आहेत. भारताचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडे हा सध्या आपल्या कामात व्यस्त आहे. तलाव सुरु होताच तो सराव सुरु करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.२०१० मधील आशियाई क्रीडा स्पर्धेचा कांस्यविजेता असलेला वीरधवल याने दुबईतील आॅलिम्पिक दावेदारांसाठी आयोजित सराव शिबिरातून बाहेर राहण्याचा निर्णय देत महाराष्ट्र शासनाच्या आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत इच्छूक आहे. हा २९ वर्षीय खेळाडू एका वृत्तसंस्थेशी म्हणाला की, कोविड महामारीमुळे मार्चपासून स्विमिंग पूल बंद आहेत. मी निवृत्त होत आहे अशी चर्चा रंगली मात्र तसेच काहीच नाही.भारतात जेव्हा स्विमिंग पूल खुले होतील तेव्हा मी पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे. मी सध्या घरीच वर्कआउट करीत आहे. स्वत:ला फिट ठेवत आहे. मी माझे काम आणि परिवाला अधिक वेळ देत आहे, याचे मला समाधान आहे. मी जूनपर्यंत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मी पाच महिन्यांपासून ट्रेनिंग केले नाही. पाच महिने खूप मोठा काळ असतो. जूनपर्यंत खूप सकारात्मक होतो. माझे पूर्ण लक्ष हे मानसिक मजबूतीवर होते. त्यानंतर मात्र माझे मन नकरात्ककडे वळले. मी स्वत:ला प्रश्न विचारत होतो. आता पुन्हा सरावाच्या प्रतिक्षेत आहे.दरम्यान, वीरधवलने गेल्या वर्षी ५० मीटरमध्ये २२.४४ सेकंदांची वेळ देत आॅलिम्पिक ‘बी’ क्वालिफिकेशन पात्रता मिळवली होती.
स्वीमिंग पूल खुले होताच सराव सुरु करणार : वीरधवल खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 2:36 AM