शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

विम्बल्डन: ब्रिटनच्या अँडी मरेला पुरुष एकेरीचे जेतेपद

By admin | Published: July 10, 2016 9:35 PM

पहिल्या दोन सेटमध्ये मरेने सरळ आघाडी घेतल्यानंतर मिलॉस रावनिचने त्याला कडवी झुंज दिली. पण मरेच्या तुफानी खेळी पुढे त्याची झुंज अपयशी ठरली.. मरेने ६-४, ७-६, ७-६ अशा सरळ सेटमध्ये त्याने बाजी मारली.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. १० : इंग्लंडचा फुटबॉल संघ युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून लज्जास्पद प्रकाराने बाहेर फेकला गेल्यानंतर या जखमेवर ब्रिटनचा नंबर वन टेनिसपटू अँडी मरे याने मलम लावताना विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम सामना जिकंला. जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित आणि ब्रिटनचा नंबर वन टेनिसपटू अँडी मरे याने रविवारी वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनच्या हायव्होल्टेज फायनल लढतीत कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्यावर मात करीत या स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला.

दोन तास ४८ मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक लढतीत द्वितीय मानांकित मरे याने सहाव्या मानांकित राओनिक याचे आव्हान ६-४, ७-६, ७-६ असे उद्ध्वस्त करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भेदक आणि वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणारा कॅनडाचा राओनिक त्याचे नाव इतिहासात नोंदवण्यापासून फक्त एक पावलाने वंचित राहिला.

मरे याला कॅनेडियन खेळाडूने कडवी झुंज दिली; परंतु ब्रिटिश खेळाडूने आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावत दुसऱ्यांदा विजेतेपदाचा बहुमान मिळवला. याआधी मरे २0१३ मध्ये येथे चॅम्पियन बनला होता.

२९ वर्षीय मरे याने पहिला सेट ६-४ असा जिंकला. त्यानंतर त्याला पुढील दोन सेट जिंकण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागले. राओनिकने मरे याला कडवी झुंज दिली; परंतु मरे याने टायब्रेकपर्यंत खेचले गेलेले दोन्ही सेट जिंकले. त्याने दुसरा सेट टायब्रेकमध्ये ७-३ आणि तिसरा सेटदेखील टायब्रेकमध्ये ७-२ असा जिंकला.

भेदक व वेगवान सर्व्हिससाठी प्रसिद्ध असणा-या कॅनडाचा वादळी खेळाडू मिलोस राओनिक यांने मरेला चागंलेच झुंजवले पण मरेने आपला पुर्ण अनुभव पणाला लावत विजय मिळवला.
 
ब्रिटिश खेळाडूला यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता; परंतु जोकोविच याचे तिस-याच फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे फायनलमध्ये मरे आणि येथील सात वेळेसचा चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्यात लढत होऊ शकते, असे अंदाज बांधले जात होते; परंतु राओनिक याने या अंदाजाला तडे देताना उपांत्य फेरीत जबरदस्त खेळ करीत फेडररला पाच सेटमध्ये नमवले. त्याबरोबर राओनिकने विम्बल्डन फायनलमध्ये पोहोचताच इतिहासही रचला. तो ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचणारा कॅनडाचा पहिला खेळाडू ठरला होता.