लंडन : अत्यंत रोमहर्षक सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने दुस-या मानांकित रॉजर फेडररला पराभूत करत पाचव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. सुमारे चार तास पचांवन्न मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात जोकोविचने फेडररला ७-६, १-६, ७-६ ,४-६, १३-१२ अशा सेटने पराभूत केले.फेडरर व जोकोविच तिस-यांदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. यापुर्वी २०१४ व २०१५ मध्ये झालेल्या सामन्यातही जोकोविचने फेडररवर मात केली होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखली. यादरम्यान फेडररलाच २-१ या स्कोअरवर एक ब्रेकपॉईट मिळाला. दुसºया सेटमध्ये फेडररने आक्रमक पावित्रा घेतला. त्याने जोकोविचच्या दोन्ही सर्विस ब्रेक करत ४-० अशी आघाडी घेतली. जोकोविचला दुसºया सेटमध्ये केवळ दोनच विनर मारता आले. सिºया सेटमध्ये जोकोविच टायब्रेकरवर अव्वल ठरला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा फेडररने बाजी मारली. फेडररने दोनवेळा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. हा सेट जिंकून फेडररने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.पाचव्या व निर्णायक सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्विस तोडतत ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र फेडररने ब्रेक पॉईट घेत सामना ४-४ असा बरोबरीत आणला. १५ व्या गेममध्ये फेडररन जोकोविचची सर्विस तोडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दोन पॉईंट घेतले. मात्र जोकोविचने शानदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. त्याने सामना ८-८ असा बरोबरीत आणला. यानंतर नव्या नियमानुसार १२-१२ असा टायब्रेकर झाला. यात बाजी मारत जोकोविचने आपले १६ वे ग्रॅँडस्लॅम जिंकले.
Wimbledon 2019: फेडररवर मात करत जोकोविच पाचव्यांदा चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:16 AM