लंडन : विद्यमान चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिच व सातवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा रॉजर फेडरर सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण आॅल इंग्लंड क्लबमध्ये जेतेपद पटकावण्यासाठी यावेळी त्यांचा मार्ग खडतर आहे. महिला विभागातही जेतेपदासाठी चुरस अनुभवाला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सेरेना विलियम्सला मारिया शारापोव्हा व गतविजेती पेत्रा क्वितोव्हा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही पुरुष विभागात रंगतदार लढती होण्याची शक्यता आहे. फेडरर, अॅण्डी मरे व राफेल नदाल यांनी विम्बल्डनपूर्वी ग्रास कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावीत स्पर्धेसाठी सज्ज असल्याची प्रचिती दिली. दुसऱ्या बाजूचा विचार करता जोकोविचने फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारताना विम्बल्डनसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. जोकोव्हिचला फ्रेंच ओपनमध्ये अंतिम लढतीत स्टेनिसलास वावरिंकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. जोकोव्हिचने गेल्या दोन विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. २०१३ मध्ये त्याला मरेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तर गेल्या वर्षी निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत त्याने फेडररचा पराभव केला होता. जोकव्हिचला यावेळीही सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे.जोकोविच म्हणाला, ‘गेल्या दोन वर्षांत विम्बल्डन स्पर्धेपूर्वी सराव स्पर्धा खेळलो नाही. पण गेल्या दोन्ही स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. गेल्या वर्षी जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली.’ जोकोविचला विम्बल्डनमध्ये सलामी लढतीत जर्मनीच्या फिलिप कोलश्रायबरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत सोमवारी सेंटर कोर्टवर रंगणार आहे. तिसरे मानांकन प्राप्त मरे कजाखस्तानच्या मिखाइल कुकुशकिनविरुद्ध सलामीला झुंजणार आहे. विम्बल्डनमध्ये यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेला फ्रेंच ओपन चॅम्पियन वावरिंकाला सलामीला पोर्तुगालच्या जोओ सोसाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. नदालची पहिल्या फेरीत गाठ ब्राझीलच्या थॉमस बेलुसीसोबत पडणार आहे. महिला विभागात पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे, पण दोनदा जेतेपदाचा मान मिळविणारी क्वितोव्हा पुन्हा एकदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. क्वितोव्हा व सेरेना यांचा वेगवेगळ्या हाफमध्ये समावेश आहे.आजारपणामुळे क्वितोव्हाच्या विम्बल्डनच्या तयारीला धक्का बसला आहे. वायरल फिव्हरमुळे तिला गेल्या आठवड्यात ईस्टबोर्न स्पर्धेतून माघारी घ्यावी लागली होती. क्वितोव्हा म्हणाली,‘आजारी असल्यामुळे मला स्पर्धेची तयारी करण्यासाठी वेळ मिळाली नाही, पण आॅल इंग्लंडमध्ये परतल्यामुळे आनंद झाला. मंगळवारी सलामी लढतीपर्यंत पूर्णपणे तंदुरस्त होईल, अशी आशा आहे.’सेरेनाची उपांत्य फेरीत २००४ ची चॅम्पियन मारिया शारापोव्हासोबत गाठ पडण्याची शक्यता आहे. सेरेनाची सलामीला गाठ जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या मार्गरिटा गॅस्परियानसोबत पडणार आहे. सेरेनाचे लक्ष्य कारकिर्दीत दुसऱ्यांदा चारही ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यावर केंद्रित झाली आहे. यापूर्वी सेरेनाने २००२ मध्ये फ्रेंच ओपनपासून २००३ च्या आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत चारही ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. विम्बल्डन फेडररचे सर्वांत आवडचे कोर्ट आहे. येथे त्याने सातवेळी जेतेपदाचा मान मिळवला आहे. यावेळी त्याची नजर दिग्गज पीट सॅम्प्रासचा विक्रम मोडण्यावर केंद्रीत झाली आहे. फेडररपुढे जोकोव्हिचच्या तुलनेत कडवे आव्हान आहे. कारण नदाल व मरे यांच्यासारखे माजी चॅम्पियन खेळाडूंचा फेडररच्या हाफमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता व १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा मानकरी असलेल्या फेडररला सलामी लढतीत बोस्नियाच्या दामिर दजुमहुरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आाहे. फेडररने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत दजुमहुरचा पराभव केला होता. तिसरे मानांकन प्राप्त मरे कजाखस्तानच्या मिखाइल कुकुशकिनविरुद्ध सलामीला झुंजणार आहे. विम्बल्डनमध्ये यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेला फ्रेंच ओपन चॅम्पियन वावरिंकाला सलामीला पोर्तुगालच्या जोओ सोसाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. नदालची पहिल्या फेरीत गाठ ब्राझीलच्या थॉमस बेलुसीसोबत पडणार आहे. महिला विभागात पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे, पण दोनदा जेतेपदाचा मान मिळविणारी क्वितोव्हा पुन्हा एकदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. क्वितोव्हा व सेरेना यांचा वेगवेगळ्या हाफमध्ये समावेश आहे. सेरेनाची उपांत्य फेरीत २००४ ची चॅम्पियन मारिया शारापोव्हासोबत गाठ पडण्याची शक्यता आहे. सेरेनाची सलामीला गाठ जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या मार्गरिटा गॅस्परियानसोबत पडणार आहे. (वृत्तसंस्था)सॅम्प्रासचा विक्रम मोडण्याची संधी..च्विम्बल्डन फेडररचे सर्वांत आवडचे कोर्ट आहे. येथे त्याने सातवेळी जेतेपदाचा मान मिळवला आहे. यावेळी त्याची नजर दिग्गज पीट सॅम्प्रासचा विक्रम मोडण्यावर केंद्रीत झाली आहे. फेडररपुढे जोकोव्हिचच्या तुलनेत कडवे आव्हान आहे. कारण नदाल व मरे यांच्यासारखे माजी चॅम्पियन खेळाडूंचा फेडररच्या हाफमध्ये समावेश आहे. च्गेल्या वर्षीचा उपविजेता व १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा मानकरी असलेल्या फेडररला सलामी लढतीत बोस्नियाच्या दामिर दजुमहुरच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आाहे. फेडररने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत दजुमहुरचा पराभव केला होता. आजारपणामुळे क्वितोव्हाच्या विम्बल्डनच्या तयारीला धक्का बसला आहे. वायरल फिव्हरमुळे तिला गेल्या आठवड्यात ईस्टबोर्न स्पर्धेतून माघारी घ्यावी लागली होती. क्वितोव्हा म्हणाली,‘आजारी असल्यामुळे मला स्पर्धेची तयारी करण्यासाठी वेळ मिळाली नाही, पण आॅल इंग्लंडमध्ये परतल्यामुळे आनंद झाला. मंगळवारी सलामी लढतीपर्यंत पूर्णपणे तंदुरस्त होईल, अशी आशा आहे.’
विम्बल्डन‘वारी’ आजपासून सुरू
By admin | Published: June 29, 2015 1:35 AM