Neeraj Chopra : भारताच्या नीरज चोप्रानं ऑलिम्पिक गोल्डनंतर पुन्हा मैदानावर उतरताना पदकांचा सपाटा लावला आहे. फिनलँड येथे नुकत्याच झालेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेत त्याने 89.30 मीटर थ्रो केला आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता आणि तो नीरजनेच केला होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. पण, आज त्याने Stockholm Diamond League स्पर्धेत याही पुढे भालाफेकून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने या स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने 10 महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले. नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. आज डायमंड लीगमध्ये नीरजने पहिल्या प्रयत्नात 89.94 मीटर लांब भालाफेकून पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक विजेत्या अँडरसन पीटर्सने 90.31 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
नीरज चौप्राची या स्पर्धेतील कामगिरी... 1st throw - 89.94 2nd throw - 84.373rd throw - 87.464th throw - 84.775th throw - 86.676th throw - 86.84