जकार्ताः इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताची नेमबाज हिना सिद्धूनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला आहे. तिच्या कांस्य कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण २३वं पदक जमा झालं असून नेमबाजांनी दिलेलं हे नववं पदक ठरलंय.
आशियाई स्पर्धेत भारताचे नेमबाज 'दर्जा' कामगिरी करत असल्यानं आज सगळ्यांचं लक्ष १६ वर्षीय मनू भाकर आणि हिना सिद्धू या जोडीवर लागलं होतं. परंतु, १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात दोघींचीही सुरुवात खराब झाल्यानं पदकाच्या आशा धुसर झाल्या होत्या. मात्र सिद्धूनं शेवटच्या फेऱ्यांमध्ये पुनरागमन केलं आणि २१९.२ गुणांसह तिसरं स्थान पटकावलं, कांस्यपदकाची कमाई केली. मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली.