शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

महिला हॉकी : भारताने यजमान अमेरिकेला नमवले

By admin | Published: July 21, 2016 9:11 PM

पहिल्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अमेरिका महिला हॉकी संघाला २-१ असे नमवले.

पराभवाचा वचपा काढलामॅनहीम (अमेरिका) : पहिल्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अमेरिका महिला हॉकी संघाला २-१ असे नमवले. रिओ आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिलांनी यासह मालिकेत बरोबरी साधली आहे.याआधी झालेल्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करुनही अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे भारताला पराभवास सामोरे जावे लागले. यावेळी मात्र भारतीयांनी चुका सुधारताना यजमानांवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. सामन्यातील पहिला क्वार्टर गोलशुन्य बरोबरीत राहिल्यानंतर आक्रमक खेळ झाला.यावेळी दुसऱ्या क्वार्टरच्या १९व्या मिनिटालाच जिल विटमरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना अमेरिकेला १-० असे आघाडीवर नेले. मात्र हा गोल अमेरिकेचा सामन्यातील अखेरचा गोल ठरला. यानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना यजमानांना पुनरागमनाची संधी दिली नाही. मध्यंतराला अमेरिकेने आघाडी कायम राखल्यानंतर भारतीयांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये प्रितीने ४५व्या मिनीटाला महत्त्वपुर्ण गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने एकामागोमाग एक हल्ले करताना यजमानांवर दबाव टाकला. अंतिम क्वार्टरमध्ये ५५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर लिलिमाने निर्णायक गोल करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दौऱ्यातील भारताचा पुढील सामना २२ जुलैला कॅनडाविरुध्द होईल.