मेलबोर्न : भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना १० गडी राखून जिंकला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा हा आॅस्ट्रेलियातील पहिलाच मालिका विजय आहे.पावसामुळे हा सामना १८ षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. आॅस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत आठ बाद १२५ अशी समाधानकारक मजल मारली. मात्र, पावसामुळे भारताला १० षटकांत ६६ धावा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. भारताने ९.१ षटकांत बिनबाद ६९ धावा करीत सामना जिंकला.भारताकडून कर्णधार मिताली राजने ३२ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. स्मृती मानधनाने २४ चेंडूंत तीन चौकारासह नाबाद २२ धावा केल्या. तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिगने ३९ चेंडूंत तीन चौकार व दोन षट्कारांसह ४९ धावा केल्या. जॅस जोनासनने २७ व अॅलेक्स ब्लॅकवेलने नाबाद १२ धावा केल्या. झूलन गोस्वामीने १६ धावांत दोन, तर राजेश्वरी गायकवाडने २७ धावांत दोन बळी घेतले. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया १८ षटकांत ८ बाद - १२५़ (लेनिंग ४९, जोनासेन २७.झूलन गोस्वामी २/१६, राजेश्वरी गायकवाड २/२७)़भारत : ९.१ षटकांत नाबाद ६९़ (मिताली राज नाबाद ३७, स्मृती मानधना नाबाद २२)़
महिला संघानेही केली कमाल
By admin | Published: January 30, 2016 2:14 AM