शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

महिला विश्वचषक आॅस्ट्रेलियाची विजयी सलामी

By admin | Published: June 27, 2017 12:52 AM

निकोल बोल्टनच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी

टाँटन : निकोल बोल्टनच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी देताना वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियाने ३८.१ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात २०५ धावा केल्या. बोल्टनने बेथ मुनीसह १७१ धावांची सलामी देत विजयावर शिक्कामोर्तब केले. कांऊटी ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात विंडिज महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. दखल घेण्याची बाब म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात विंडिज कर्णधार स्टेफनी टेलर गोंधळून गेली आणि तिने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिला प्रथम क्षेत्ररक्षण घ्यायचे होते. याचा फटका पुर्ण संघाला सामन्यात बसला. विंडिजचा डाव ४७.५ षटकात २०४ धावांमध्ये आॅसीने गुंडाळला. वेस्ट इंडिजचे अखेरचे ७ फलंदाज केवळ ४७ धावांमध्ये तंबूत परतले. आॅस्टे्रलियाने हा सामना अत्यंत एकतर्फी ठरवताना ३८.१ षटकांमध्येच विजयी लक्ष्य गाठले. (वृत्तसंस्था)बोल्टनने ११६ चेंडूत १४ चौकार मारताना नाबाद १०७ धावा काढल्या. मूनीने देखील ८५ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ७० धावा काढल्या. या दोघींनी १७१ धावांची सलामी देत संघाच्या विजयाची औपचारीकता शिल्लक ठेवली. मूनीनंतर विंडिज संघाने आॅसी कर्णधार मेग लँनिंग (१२) हिला झटपट बाद केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तत्पूर्वी, सलामीवीर हायले मॅथ्यूज (४६), कर्णधार टेलर (४५), चेडीन नेशन (३९) आणि डींद्रा डॉट्टिन (२९) यांच्यामुळे वेस्ट इंडिजला २००चा टप्पा पार करता आला. एलिस पेरी हिने ४७ धावांत ३ बळी घेतले, तर क्रिस्टन बिम्सने ३० धावांत २ आणि जेस जॉन्सन हिने ३९ धावांत २ बळी घेत विंडिज फलंदाजीला खिंडार पाडले. मेगन स्कटने एक बळी घेतला. आता, २९ जूनला आॅस्टे्रलियाचा संघ श्रीलंकाविरुध्द भिडेल, तर त्याच दिवशी वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाविरुद्ध दोन हात करेल. (वृत्तसंस्था)