शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

विजय-पूजाराची शतके, शेवटच्या सत्रात भारताला तीन धक्के

By admin | Published: November 11, 2016 11:25 AM

तिस-या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही शेवटच्या सत्रात कमी धावांच्या अंतराने तीन गडी बाद झाल्याने भारताचा डाव काहीसा अडचणीत आला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

राजकोट, दि. ११ -  तिस-या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही शेवटच्या सत्रात कमी धावांच्या अंतराने तीन गडी बाद झाल्याने भारताचा डाव काहीसा अडचणीत आला आहे. दिवसअखेर भारताच्या ४ बाद ३१९ धावा झाल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद (२६) धावांवर मैदानात आहे. इंग्लंडपेक्षा भारत अजूनही २१८ धावांनी पिछाडीवर आहे.
 
दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर नाईट वॉचमन अमित मिश्राला (०) अन्सारीने हमीदकरवी झेलबाद केले. त्याआधी दमदार शतक झळकवणारा मुरली विजय (१२६) धावांवर बाद झाला. त्याला राशिदने हमीदकरवी झेलबाद केले. गौतम गंभीरच्या रुपाने सकाळच्या सत्रात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पूजारा जोडीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हुकूमत गाजवली.
 
एकबाजूने दमदार फलंदाजी करणारा चेतेश्वर पूजारा (१२४) धावांवर बाद झाला. स्टोक्सने त्याला कुककरवी झेलबाद केले. पूजारा आणि विजयने दुस-या विकेटसाठी २११ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी मुरली विजय (११२) आणि चेतेश्वर पूजारा (१२४) यांच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले. दोघांनी चौफेर फटकेबाजी करताना खो-याने धावा वसूल केल्या. इंग्लंडचे गोलंदाज या जोडीपुढे हतबल झाले होते. पुजाराने २२४ चेंडूत १०० धावा केल्या. 
 
इंग्लंडने पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतानेही चांगली सुरुवात केली. ब्रॉडच्या गोलंदाजीवर गंभीर २९ धावांवर पायचीत झाला. इंग्लंडकडून रुट (१२४), मोईन अली (११७)  आणि स्टोक्स (१२८) या तिघांच्या दमदार शतकाच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डाव ५३७ धावांवर घोषित केला. 
 
बांगलादेशात निराशाजनक कामगिरी करणा-या इंग्लिश संघाचा भारतात निभाव लागणार नाही असे बोलले जात होते. पण पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातच इंग्लंड संघाने टीकाकारांना खोडून काढले. भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.