शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर मेडल जिंकणार

By admin | Published: June 28, 2016 6:23 AM

प्रेमाच्या बळावर आपण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू, असा विश्वास आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने व्यक्त केला़

चन्नवीर मठ,

बार्शी- सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: बार्शीकरांच्या प्रेमाने आपण भारावलो आहोत़ आपले स्वागत अशा पद्धतीने होईल याची जराही कल्पना नव्हती़ या प्रेमाच्या बळावर आपण रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू, असा विश्वास आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने व्यक्त केला़रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर प्रथमच तिचे बार्शीत सोमवारी आगमन झाले़ तिच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत क्रीडारसिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ बार्शीत ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्जद्वारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची शुभेच्छांची फलके शहरात गल्लोगल्ली दिसत आहेत़ ज्येष्ठ नेते भाऊसाहेब झाडबुके आणि प्रभाताई झाडबुके यांची नात असलेल्या प्रार्थना ठोंबरेच्या स्वागतासाठी व तिला रिओ आॅलिम्पिकला शुभेच्छा देण्यासाठी तरुण, विविध पदाधिकाऱ्यांची गर्दी सकाळपासूनच प्रभाशंकर बंगल्यात जमत होती़ बार्शीचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेल्या तथा माजी आमदार प्रभाताई झाडबुके या आवर्जून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत होत्या़ सोबत प्रार्थनाची आई वर्षाताई ठोंबरे, थोरली बहीण प्रांजल या दोघींचीही घाई सुरू होती़ दरम्यान, वडील गुलाबराव ठोंबरे यांच्यासमवेत प्रार्थनाचे प्रभाशंकर या बंगल्यावर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ वर्षाताई यांनी प्रार्थना हिचे औक्षण करून पेढा भरवून स्वागत केले़ या वेळी बार्शीतील अनेक मान्यवर उपस्थित होते़ बंगल्यात प्रवेश केल्यानंतर आजी प्रभाताई यांनी आपल्या लाडक्या नातीला कडकडून मिठी मारली़ प्रार्थनाने आजीचे आशीर्वाद घेतले़ या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजीव देसाई यांनीही प्रार्थनाचे अभिनंदन केले़ माध्यम प्रतिनिधींच्या गराड्यात प्रार्थनाने घरात प्रवेश केला़ >‘प्रार्थना ही माझी दुसरी मुलगी’सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा हे आपली खूप काळजी घेतात़ सानियाप्रमाणेच त्यांनी आपल्याला दुसरी कन्या मानल्याचे उद्गार प्रार्थना ठोंबरे हिने काढले़ सध्या ती सानिया मिर्झा हिच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे़ त्यामुळे सानिया व प्रार्थना यांच्या कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे़ इम्रान मिर्झा यांनी प्रार्थना ठोंबरे हिला दुसरी कन्या मानले आहे़ याच पार्श्वभूमीवर प्रार्थनाने आपल्या भावनांना वाट करून दिली़सर्वांत आधी प्रार्थना लोकमत आॅनलाइनवऱ़़रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर बार्शीची सुकन्या प्रार्थना ठोंबरे हिचे प्रथमच बार्शीत आगमन झाल्यानंतर तिचे आॅनलाइन लाइव्ह चित्रण सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले़ प्रभाशंकर बंगल्याच्या बाहेर फँड्री व सैराट या मराठी चित्रपटांत असलेल्या केमच्या हलगी पथकाच्या ठेक्यावर तरुणाईचे जोरदार झिंगाट सुरू होते़ या हलगी पथकाला पाहण्यासाठी मुलीही मागे नव्हत्या़ या वेळी तरुणांबरोबर तरुणींची संख्याही लक्षणीय होती़ विविध रंगांचे फटाके, आतषबाजी आणि गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात प्रार्थनाची खुल्या जीपमधून मिरवणूक निघाली़ जीपमध्ये प्रार्थनासमवेत गुलाबराव, वर्षाताई आणि प्रांजल हेही उपस्थित होते़