शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

इतिहास रचला! Neeraj Chopraसह ३ भारतीय फायनलमध्ये; India vs Pakistan गोल्डन मॅच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 4:24 PM

World Athletics Championship - भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला.

World Athletics Championship - भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) सह डी.पी. मनू आणि किशोर जेना यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच भालाफेकीच्या फायनलमध्ये तीन भारतीय सहभागी होणार आहेत. नीरज ८८.७७ मीटर सह अव्वल स्थानावर राहिला, तर मनू ( ८१.३१ मी.) व किशोर ( ८०.५५ मी.) हे अनुक्रमे ६ व  ९ व्या क्रमांकावर राहिले. अव्वल १२ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये गोल्ड मेडलसाठी India vs Pakistan असा सामना होणार आहे. कारण, पाकिस्तानचा अर्शद नदीमने ८६.७९ मीटरसह दुसरे स्थान पटकावले आहे. 

एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं

क्वालिफिकेशन ए मध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासह त्याने २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचेही ( पात्रता मार्क - ८५.५० मीटर) तिकीट पटकावले. भारताच्या डी. पी. मनूने पहिल्यात प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता अन् नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर ८२.३९ मीटरसह दुसरा राहिला, तर मनू ८१.३१ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ''लंडन वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून मी शिकलो आणि येथे पहिल्याच प्रयत्नात क्वालिफायन होण्याचा निर्धाराने उतरलो,''असे नीरजने म्हटले.  क्वालिफिकेशन बी मध्ये झेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅड्लेजने दुसऱ्या प्रयत्नात ८३.५० मीटरचे अंतर पार करून फायनलची पात्रता निश्चित केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ८१.८३ मीटर भाला फेकला. भारताच्या किशोर जेनाने पहिल्या प्रयत्नात ८०.५५ मीटर भाला फेक केली. अर्शदने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७९ मीटर लांब भालाफेक करून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. यासह त्याने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पटकावले.

किशोरचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याला इतरांच्या कामगिरीवर अलवंबून रहावे लागले आणि नवव्या स्थानासह तो पात्र ठरला.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान