शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

विश्वचषकातील ‘बेंच स्ट्रेंथ’चा आयपीएलमध्ये जलवा

By admin | Published: April 11, 2016 2:07 AM

वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा टी-२० विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य नव्हता, आॅफ स्पिनर हरभजन सिंगला विश्वकप स्पर्धेत संधी मिळाली नाही तर अजिंक्य रहाणे जवळजवळ राखीव खेळाडूंमध्ये बसलेला होता.

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा टी-२० विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य नव्हता, आॅफ स्पिनर हरभजन सिंगला विश्वकप स्पर्धेत संधी मिळाली नाही तर अजिंक्य रहाणे जवळजवळ राखीव खेळाडूंमध्ये बसलेला होता. पण, या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलच्या नवव्या पर्वातील सलामी लढतीत आपली छाप सोडली. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलच्या नवव्या पर्वातील नवा संघ राइजिंग पुणे सुपरजायन्ट्सने गत विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ३२ चेंडू व ९ गडी राखून विजय साकारला. ईशांत व रहाणे पुणे संघाचे सदस्य होते तर हरभजन मुंबई संघाचा खेळाडू आहे. ईशांतचा परफेक्ट स्टार्टवेगवान गोलंदाज ईशांत शर्माने मुंबई इंडियन्सच्या डावात सुरुवातीला दोन बळी घेते त्याच्यावर केवळ कसोटी गोलंदाज असल्याचा टॅग लावणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले. ईशांतने सुरुवातीच्या दोन षटकांत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताच्या आशा संपुष्टात आणणाऱ्या लेंडल सिमन्सला बाद करीत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकलले. सुरुवातीच्या या धक्क्यातून गत चॅम्पियन संघ अखेरपर्यंत सावरला नाही. ईशांतने ३६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. पुणे संघाच्या विजयात ईशांतचा स्पेल महत्त्वाचा ठरला. भज्जीची अष्टपैलू चमकआॅफ स्पिनर हरभजन सिंगला आशिया कप स्पर्धेत केवळ एक लढत खेळण्याची संधी मिळाली तर विश्वकप स्पर्धेत त्याला संधीही मिळाली नाही, पण हरभजनने आयपीएलच्या या लढतीत अष्टपैलू कामगिरी करताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चूक असल्याचे सिद्ध केले. हरभजनला उपांत्य लढतीत संधी मिळायला पाहिजे होती. त्याऐवजी मनीष पांडेला पाचारण करीत अंतिम संघात स्थान देण्यात आले होते. हरभजनने मुंबई इंडियन्सतर्फे ३० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ४५ धावा केल्या. शिवाय १ बळीही घेतला.रहाणेची फलंदाजीनाबाद ६६ धावांची खेळी करीत पुणे संघाला विजय मिळवून देत सामनावीर ठरलेल्या रहाणेवर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा अधिक विश्वास नसतो. रहाणेला विश्वकप स्पर्धेत केवळ एक लढत (सेमीफायनल) खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले होते. पण, रहाणेने त्याला पूर्ण संधी मिळणे आवश्यक असल्याचे सिद्ध केले. रहाणेने ४२ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी केली. एक्सपर्टच्या भूमिकेत असलेल्या वकार युनूसने या फलंदाजाला अधिक संधी मिळायला पाहिजे होती, असे मत व्यक्त केले.