नवी दिल्ली : विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने पदार्पण करत विजय मिळवला. मात्र त्यानंतरही भारताला कजानमध्ये सुरू असलेल्या विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये आपल्या दुसºया लढतीत रशियाकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला.रशियाच्या पॅट्रियट बॉक्सिंग टीम विरोधात इंडियन टायगर्स संघाला हा दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. या आधी पहिल्या सामन्यात कजाकिस्तानच्या अस्ताना आर्लन्सविरोधात १-४ असा पराभव पत्करावा लागला.डब्ल्यूएसबीमध्ये आपल्या पहिल्या बाऊटमध्ये सहभागी होत असलेल्या १९ वर्षांच्या सचिन याने काल रात्री झालेल्या लढतीत भारताला शानदार सुरुवात करून दिली. त्याने रशियाच्या डोर्जो रेदनेव याला लाईट फ्लायवेट (४९ किलो) गटात पराभूत केले. सचिन याने पहिल्या दोन राऊंडमध्ये मागे पडल्यावरदेखील स्थानिक दावेदार रेदनेव याला अंतिम तीन राऊंडमध्ये मागे टाकत सामना २-१ असा जिंकला.या आधी राष्ट्रकुल खेळांत रौप्यपदक विजेत्या मनदीप जांगडा (७५ किलो), किंग्ज कपमध्ये कांस्यपदक पटकावणाºया रोहित टोकस (६४ किलो) आणि माजी राष्ट्रीय चॅम्पियन मदनलाल (५२ किलो) यांना पराभव पत्करावा लागला.रमजान सादुएव विरोधातील सामन्यात मनदीपच्या डाव्या डोळ्याच्या वर कटदेखील लागला. भारताला डब्लुएसबीचा पुढचा सामना अस्ताना अर्लन्स विरोधात २४ मार्च रोजी खेळायचा आहे.संजित पराभूतडब्ल्यूएसबीमध्ये पर्दापण करणाºया संजित (९१ किलो) याचा खेळ प्रभावी होता. जानेवारी इंडिया ओपनमध्ये सुवर्णपदक पटकावणाºया २१ वर्षांच्या खेळाडूला एंटन जेतसेवकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्याने कडवी टक्कर दिली.
विश्व बॉक्सिंग सिरीज : सचिन सिवाचचा पदार्पणातच विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:57 AM