शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन कार्निव्हल’

By admin | Published: April 04, 2016 3:18 AM

रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले.

कोलकाता : रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले. तर रात्री भारताला हरवत अंतिम फेरी गाठणाऱ्या विंडिजच्या पुरुष संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना शेवटच्या षटकातील कार्लोस ब्रेथवेटच्या सलग चार षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर इंग्लंडला धूळ चारत विश्वविजेतेपदावर दुसऱ्यांदा मोहोर उमटवली. त्यानंतर ईडन गार्डनवर ‘कॅरेबियन कार्निव्हल’च साजरा झाला.

ज्याच्या खेळीवर संघाच्या विजयाचे गणित अवलंबून असते तो तुफानी ख्रिस गेल स्वस्तात बाद झाला.... त्याआधी संपूर्ण स्पर्धेत संघातील सर्वात यशस्वी फलंदाजही केवळ एक धाव काढून बाद झाला... तर उपांत्य सामन्यात यजमान भारताविरुध्द एकहाती विजय मिळवून देणारा लेंडल सिमन्सही शून्यावर परतल्यानंतर वेस्ट इंडिज इंग्लंडविरुद्ध हातातील विजेतेपद गमावणार असेच चित्र टी२० अंतिम सामन्यात होते. मात्र एका बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्लन सॅम्युअल्सने अखेरपर्यंत संघाचा किल्ला लढवताना नाबाद ८५ धावांचा विजयी तडाखा देत संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेपदाचा मान मिळवून दिला. तरी सर्वांच्या लक्षात राहिला तो अंतिम सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा कार्लोस ब्रेथवेट. अखेरच्या सहा चेंडूवर विंडिजला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेटने चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकत विजयश्री खेचून आणली.>हा ठरला टर्निंग पॉइंट...सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरने सॅम्युअल्सचा झेल घेतला आणि इंग्लंडने जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी विंडिजची अवस्था ३ बाद ३७ धावा अशी होती आणि त्यात सॅम्युअल्सचा बळी जात होता. मात्र रिप्लेमध्ये बटलरकडून झेल घेताना चेंडू जमिनीला टेकल्याचे स्पष्ट झाले व सॅम्युल्सला नाबाद ठरला. पुढे त्यानेच संघासाठी विजयी खेळी केली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला.2012सालीदेखील अंतिम फेरीत सॅम्युअल्सने श्रीलंकेविरुध्द ७८ धावा कुटताना संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा विराट कोहलीनंतर (२७३) जो रुट (२४९) दुसऱ्या क्रमांकावर. टी२० विश्वचषकमध्ये विंडिज इंग्लंडविरुध्द अद्यापही अपराजित. 24धावा वेस्ट इंडिजने अखेरच्या षटकात फटकावल्या. हा आंतरराष्ट्रीय टी२० मधील विश्वविक्रम आहे.>अखेरच्या षटकात युवराजची आठवण...२००७ साली झालेल्या पहिल्या वहिल्या टी२० विश्वचषकात विजेता ठरलेल्या भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विंडिजच्या ब्रेथवेटनेही काहीसा असाचा प्रयत्न करताना इंग्लंडविरुध्द अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूवर षटकार ठोकून युवीची आठवण करुन दिली.2010साली विजेतेपद पटकावलेल्या इंग्लंडचे पहिलेच उपविजेतेपदएकाच विश्वचषक स्पर्धेत एकाच देशाच्या दोन संघांनी बाजी मारण्याची पहिलीच वेळदोन वेळा टी२० विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिज पहिला संघ.दोन वेळा अंतिम फेरी गाठताना वेस्ट इंडिजने दोन्ही वेळा शानदार बाजी मारली.