शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:52 AM

वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिस हिला पराभूत करून मी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय नोंदवला.

- पूजा धांडा, पंजाब रॉयल्सवर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिस हिला पराभूत करून मी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय नोंदवला. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या लढतीआधी मी जय-पराजयचा कोणताही विचार केला नव्हता. मी केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. नशिबाने या लढतीआधी मी ट्युनिशियाची आणखी एक आॅलिम्पिक पदक विजेती मार्वा आमिरी हिच्याविरुद्ध लढले. या लढतीतून अनेक गोष्टी शिकता आल्या आणि त्याचा फायदा हेलेनविरुद्ध झाला.मार्वाने मला चांगल्या प्रकारे जखडवून ठेवले होते. तिने केलेल्या चालीचा वापर मी या लढतीमध्ये करून आक्रमक पवित्रा घेतला. ही रणनीती यशस्वी ठरली आणि मी काही गुण मिळवण्यात यशस्वी ठरले. हेच मला पाहिजे होते. तांत्रिक कारणामुळे मिळालेले ४ गुण माझा आत्मविश्वास वाढवणारा ठरले. माझ्या पाठीराख्यांनीही जयघोष करत स्टेडियम दणाणून सोडले. या विजयामुळे मी खरंच खूप आनंदित आहे; पण सर्व काही येथेच संपत नसल्याची जाणीवही आहे.पुढच्या लढतीमध्ये मी संगीता फोगटच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. तीसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये असून तिनेही वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केले आहे. ती एक चांगली रेसलर असल्याची शंकाच नाही. एकदा मी तिच्याविरुद्ध पराभूत झाले आहे, पण तो अपवाद वगळता नेहमीच मी तिच्यावर वरचढ ठरली आहे. या लढतीत विजय मिळवण्याचा मला विश्वास आहे. त्याहून जास्त राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती ओडुनयोविरुद्धच्या लढतीकडे माझे जास्त लक्ष लागले आहे. मला तिचा खेळ जवळून जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. कारण यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत माझी पहिल्या फेरीत ओडुनयोविरुद्ध खेळण्याची शक्यता जास्त आहे. यूपी दंगल संघाच्या वेनेसा कलाद्झींस्काया हिची पकड करण्यात मी अपयशी ठरले, असे अनेकांचे मत आहे. पण मी या मताशी सहमत नाही. खरं म्हणजे वेनेसाने जे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवले आहे, तेवढे यश मी मिळवू शकले नाही. ती माझ्याहून खूप अनुभवी खेळाडू आहे. यासाठी मी माझ्या पंजाब रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करते. आता हेलेनविरुद्धच्या विजयानंतर माझा आत्मविश्वास उंचावला असून यामुळे मला आणि माझ्या संघाला नक्कीच खूप फायदा होईल.गतवर्षी मी दुखापतीतून सावरून या लीगमध्ये सहभागी झाले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही माझी पहिलीच स्पर्धा होती. मी त्यावेळी फार चांगली कामगिरी करु शकले नव्हती. पण एकूणच वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंविरुद्ध खेळताना मिळालेला अनुभव आत्मविश्वास उंचावणारा ठरला. हेलेनसारख्या आॅलिम्पिक चॅम्पियनला वर्षभरात नमविण्याचा मी कधीच विचारही केला नव्हता. यजमान म्हणून जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याचे स्वातंत्र्य आम्हाला देण्यात मिळाले. ही संधी सर्व खेळाडूंना दिल्याबद्दल डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण आणि प्रोस्पोर्टिफायचे कार्तिकेय शर्मा यांचे मी मनापासून आभार मानते.