बिलियर्ड्स : विक्रमी 12वे विजेतेपद; ‘ग्रॅण्ड डबल्सचीही ‘हॅट्ट्रिक’
लीडस् : भारताचा दिग्गज बिलियर्डपटू पंकज अडवाणी याने विश्व बिलियर्डस चॅम्पियनशिपच्या टाइम फॉरमॅटमध्ये गुरुवारी विक्रमी जेतेपद पटकविले. त्याचे हे 12वे विश्वविजेतेपद आहे. शिवाय एका मोसमात दीर्घ आणि लहान फॉरमॅटमध्ये ‘ग्रॅण्ड डबल्सची ‘हॅट्ट्रिक’देखील पूर्ण केली. 2क्14 हे वर्ष पंकजसाठी खूप लकी ठरले. त्याने यंदा चार विश्वविजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला.
बेंगळुरू येथील 29 वर्षाचा ‘गोल्डन बॉय’ पंकजने इंग्लंडचा युवा खेळाडू रॉबर्ट हॉल याच्याविरुद्धच्या एकतर्फी फायनलमध्ये 1928-893 अशा फरकाने शानदार विजय साजरा करीत आईला वाढदिवसाची अनोखी भेट दिली़ त्याने गत आठवडय़ात पीटर गिलािस्टला नमवून 15क् अप प्रकारातील विश्वविजेतेपद पटकविले होते हे विशेष.
टाइम फॉरमॅटच्या उपांत्य सामन्यात पंकजने बेंगळुरूचाच पंकज भालचंद्र याला पराभूत केल्यानंतर निर्णायक लढतीत इंग्लंडच्या खेळाडूला सहजरीत्या धूळ चारली. तो तिस:यांदा ग्रॅण्ड डबल्स पूर्ण करणारा एकमेव बिलियर्डस्पटू ठरला आह़े याआधी माईक रसेल याने 2क्1क् आणि 2क्11मध्ये ‘ग्रॅण्ड डबल्स’ जिंकले होते. अडवाणीने याआधी 2क्क्5 साली माल्टा तसेच 2क्क्8मध्ये बेंगळुरू येथे ग्रॅण्ड डबल्स जिंकले होते. पंकजचा सर्वश्रेष्ठ खेळ फायनलमध्ये पाहायला मिळाला. पाच तास रंगलेल्या अंतिम लढतीच्या पहिल्या सत्रत 185 ब्रेकच्या साहाय्याने पंकजने 746-485 अशी आघाडी संपादन केली. दुस:या सत्रत 94, 182, 289 आणि 145 गुण मिळवित अवघ्या दोन तासांत हजार गुण मिळविले. एक तासाचा खेळ शिल्लक असतानाच अडवाणीचा विजय दृष्टिपथात आला होता. त्याने 94, 93, 59, 58, 62 आणि 9क् असे ब्रेक लगावून जेतेपद निश्चित केले.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना पंकज म्हणाला, ‘‘माङया शिरपेचात अनेक विक्रम असले तरी येथे दाखल होण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर दिला होता. कठोर मेहनत घेतली त्याचा फायदा झाला आहे. दुस:या हाफपध्ये 26क् गुणांची आघाडी मिळताच सामन्यावर पकड असल्याचे मला कळून चुकले होते. पण हॉलमध्ये मुसंडी मारण्याची क्षमता आहे हे ओळखून प्रत्येक संधीत अधिकाधिक गुण मिळविण्याचा माझा प्रयत्न होता. ऑन लाइन सामना पाहणा:या भाऊ श्रीशी मी चर्चा केली. त्याने जो सल्ला दिला त्यामुळे लाभ झाला. सर्वाच्या शुभेच्छांमुळे हे जेतेपद पटकावू शकलो.’’ (वृत्तसंस्था)
आईला वाढदिवसाची भेट!
आई मी तुङया वाढदिवशी 12वे विश्वविजेतेपद पटकविले. ही विशेष बाब आहे. एक डझन विश्वजेतेपदासोबतच ग्रॅण्ड डबल्सची ‘हॅट्ट्रिक’ हेदेखील विशेषच! आईला वाढदिवसाची ही भेट आहे. तू माझी ऊर्जा आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा! पण तू इथे उपस्थित असतीस तर ‘दुग्धशर्करा योग’ ठरला असता. - पंकज अडवाणी, विश्वविजेता बिलियर्डपटू