टिबिलिस (जॉर्जिया) : पाच वेळा जगज्जेता असलेल्या विश्वनाथ आनंदला कॅनडाच्या अंतोन कोवायलोवकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आनंदचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.पहिल्या फेरीतील दुसºया सामन्यात आनंदला संघर्ष करावा लागला. हा सामना बरोबरीत रोखला तरी आनंदला आपली लय सापडली नव्हती. दोन सामन्याच्या गेममध्ये एका गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर आनंदला आता काळ्या मोहºयांनी खेळून विजय संपादन करावा लागणार आहे. जर आनंदने हा सामना जिंकला, तर टायब्रेकवर निकाल लागणार आहे.दरम्यान, ग्रॅँडमास्टर विदिती गुजरातीने व्हियतनामच्या के ली कुआंगला पराभूत करीत तिसºया फेरीतील प्रवेश निश्चित केला. एस. पी. सेतूरामनने हरिकृष्णाबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला. दुसºया सामन्यात जगज्जेता मॅग्नस कार्लसनने रशियाच्या अलेक्स द्रिव याला पराभूत केले, तर ब्लादिमिर क्रॅमनिकने रशियाच्याच अंतोन देमशेंकोला पराभूत केले. (वृत्तसंस्था)
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा: आनंद स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता, अंतोन कोवायलोवकडून पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:42 AM