दुबई : क्रिकेट विश्वचषक सुरक्षित आणि भ्रष्टाचारमुक्त पार पाडणे हे आयोजकांसाठी सर्वांत अवघड आव्हान असल्याची कबुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्ड्सन म्हणाले, की विश्वचषकाचा प्रारंभ आॅस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या लढतींद्वारे होईल. यंदा स्पर्धेत सर्वाधिक खर्च झाला तो सुरक्षेवर. आधी प्रवास आणि निवासावर सर्वाधिक खर्च व्हायचा. पण यंदा सुरक्षेवर सर्वाधिक खर्च झाला. विश्वचषकातील बक्षिसांच्या रकमेपाठोपाठ सुरक्षेवर खर्च केला जात आहे. जगातील घडामोडींचा विचार केल्यास आमची व्यवस्था चोख असल्याने कुठलाही धोका उद्भवण्याची शक्यता नाही.द. आफ्रिकेचे माजी यष्टिरक्षक असलेले रिचर्ड्सन पुढे म्हणाले, की स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगवर विशेष लक्ष राहील. असे काही घडल्यास स्पर्धेला गालबोट लागेल. यंदा विश्वचषकाची अभूतपूर्व तयारी झाली आहे. हा विश्वचषक भ्रष्टाचारमुक्त असेल. भ्रष्टाचारविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांची प्रत्येक घडामोडीवर बारकाईने नजर असेल. एसीयू युनिट गेल्या तीन वर्षांपासून आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड पोलिसांसोबत समन्वयाने काम करीत आहे. गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत आमची गुप्तचर यंत्रणा आणखीच सक्षम झाली. फिक्सर कोण आणि ते आपले काम कसे करतात, याबाबत आम्ही गेल्या विश्वचषकादरम्यान अनभिज्ञ होतो, पण यंदा आमच्याकडे सविस्तर डाटाबेस सज्ज आहे.(वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलियाचे दक्षता पथक आणि पोलिसांना शंभरावर नावे दिली जातील. हे व्यक्ती खेळाडूंच्या जवळपासदेखील फिरकणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल. प्रत्येक सामनास्थळी एसीयूचे दोन अधिकारी असतील. ते हॉटेल आणि मैदान दोन्ही ठिकाणी तैनात राहतील. याशिवाय खेळाडूंनादेखील माहिती दिली जात आहे. खेळाडूंना सावध करण्यात आयसीसी कुठेही मागे राहणार नाही.- रिचर्ड्सनद. आफ्रिकेचे माजी यष्टिरक्षक
भ्रष्टाचारमुक्त विश्वचषक हे मोठे आव्हान : आयसीसी
By admin | Published: February 05, 2015 1:27 AM