शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 2:57 AM

कोरिया सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कीसह ५३ देशांच्या २९४ नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

नवी दिल्ली : भारताने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप नेमबाजीमध्ये १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वर्चस्व गाजवताना रविवारी पुरुष महिला या दोन्ही विभागांत सुवर्णपदक पटकावले. भारताची यशस्विनी सिंग देसवाल, मनू भाकर व श्री निवेथा यांच्या संघाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल टीम स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. 

त्यानंतर युथ ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा व शाहजार रिजवीच्या संघाने पुरुष विभागात अंतिम फेरीत व्हिएतनामचा १७-११ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. शनिवारी २३ वर्षीय देसवालने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत मायदेशातील सहकारी भाकरला पिछाडीवर सोडत सुवर्णपदक पटकावले होते. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये चौधरीने रौप्य, तर वर्माने कांस्य पदक पटकावले. कोरिया सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कीसह ५३ देशांच्या २९४ नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

क्वालिफिकेशनमध्येही राखले वर्चस्व

महिला विभागात भारतीय संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत १६ शॉट लगावले आणि पोलंडच्या जुलिता बोरेक, योआना इवोना वावरजोनोवस्का व एग्निस्का कोरजवो यांना पिछाडीवर सोडले. कर्णी सिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पोलंड संघाला केवळ ८ गुण मिळविता आले. भारतीय संघाने दुसऱ्या क्वालिफिकेशनमध्ये ५७६ गुण नोंदवीत अव्वल स्थान मिळविले होते, तर पोलंडचा संघ ५६७ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.पहिल्या क्वालिफिकेशनमध्ये भारतीय खेळाडूंनी सहा सिरीजमध्ये २९०, २८७, २८८, २९३ आणि २८७ सह एकूण १७३१ गुण नोंदविले. पोलंडने २८६, २८३, २८६, २८६, २८६ आणि २८७ च्या सिरीजसह १७०१ गुण नोंदविले. 

टॅग्स :Shootingगोळीबार