शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

विश्वचषक नेमबाजी : ज्युनिअर नेमबाजांचा गोल्डन धमाका; हृदय हजारिका, महिला संघाचे सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 2:15 AM

चांगवोन : भारतीय नेमबाज हृदय हजारिकाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. इलोवेनील वारारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदकाची कमाई केली. फायनलमध्ये तिला विश्वकपमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणारी चीनची नेमबाज शी मेंगयोकडून पराभव स्वीकारावा ...

चांगवोन : भारतीय नेमबाज हृदय हजारिकाने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. महिला संघाने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. इलोवेनील वारारिवानने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदकाची कमाई केली. फायनलमध्ये तिला विश्वकपमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणारी चीनची नेमबाज शी मेंगयोकडून पराभव स्वीकारावा लागला. इलोवेनीलने २४९.८ अंक नोंदवले तर शी मेंगयोने २५०.५ अंकांची नोंद केली. १७ वर्षीय श्रेया अग्रवालले फायनलमध्ये २२८.४ अंकांसह कांस्यपदक पटकावले.स्पर्धेच्या ५२ व्या टप्प्यात सहाव्या दिवशी चार पोडियम स्थान मिळवल्यामुळे भारताची पदकांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. आयएसएसएफ प्रीमिअर स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी सहा पदकापर्यंत निर्धारित होती. क्रोएशियाच्या जगरेबमध्ये ४९ व्या टप्प्यात भारताने ही कामगिरी केली होती.अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय हजारिकाने ६२७.३ चा स्कोअर केला. फायनलमध्ये हजारिका व इराणचा मोहम्मद आमिर नेकुनाम यांचे समान २५०.१ असे समान गुण होते.हजारिकाने शूटआॅफमध्ये निर्णायक कामगिरी करताना विजय नोंदवला. रशियाच्या ग्रिगोरी सामाकोव्ह याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे, भारतीय संघ १८७२.३ गुणांसहचौथ्या स्थानी राहिला. त्यात हजारिका, दिव्यांश पवार आणि अर्जुन बाबुटा यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)ज्युनिअर महिला संघाचे वर्चस्वभारतीय महिला १० मीटर एअर रायफल संघाने १८८०.७ च्या स्कोअरसह विश्वविक्रम नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय संघातर्फे इलावेनील वालारिवान (६३१), श्रेया अग्रवाल (६२८.५) आणि मानिनी कौशिक (६२१.५) यांनी चांगली कामगिरी केली.

टॅग्स :Shootingगोळीबार