नेपोली : राष्टÑीय विक्रमाची मानकरी असलेली धावपटू द्युतीचंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकवून ऐतिहासिक कामगिरी केली. नेपोली शहरात सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेच्या शंभर मीटर शर्यतीत २३ वर्षांच्या दुतीने ११.३२ सेकंद वेळेची नोंद करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. चौथ्या लेनमध्ये धावत दुतीने आठ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठले. स्वित्झर्लंडची डेल पोंडे दुसऱ्या आणि जर्मनीची सिझा वायी तिसºया स्थानी आली.
ओडिशाची खेळाडू असलेली द्युती विश्व स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी हिमा दासपाठोपाठ दुसरी भारतीय धावपटू बनली. हिमाने मागच्यावर्षी विश्व ज्युनियर अॅथलेटिक्सच्या ४०० मीटर शर्यतीच सुवर्ण जिंकले होते. द्युतीने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० आणि २०० मीटरचे रौप्य जिंकले होते. विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू असून महिलांमध्ये ही कामगिरी तिने प्रथमच केली, हे विशेष. २०१५ साली पुरुष गटात इंदरजित सिंग याने गोळाफेकीचे सुवर्णपदक जिंकले होते. दुतीने पात्रता फेरीत ११.४१ सेकंद वेळ नोंदविली होती. द्युतीला आता दोहा येथे सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये होणाºया विश्व स्पर्धेसाठी पात्रता गाठायची आहे. विशेष म्हणजे, याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला विद्यापीठ स्पर्धेमध्ये १०० मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. (वृत्तसंस्था)मी झेप घेतच राहणार...समलैंगिक संबंधांची कबुली देणाºया दुतीने विजयानंतर सांगितले की, ‘मला कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरीही प्रयत्नपूर्वक उंच झेप घेण्याचा माझा प्रयत्न असेल. इतक्या वर्षांची मेहनत आणि सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर मी हे सुवर्णपदक जिंकू शकले.’- द्युतीचंदमान्यवरांकडून अभिनंदनविद्यापीठ स्पर्धेत शंभर मीटर शर्यत जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय खेळाडूचे या खेळातील हे पहिले सुवर्ण असल्याने आमचा गौरव वाढला आहे, ही कामगिरी आॅलिम्पिकमध्ये कायम राहावी.- रामनाथ कोविंद, राष्टÑपती.एका साधारण खेळाडूची असाधारण उपलब्धी. कठोर मेहनतीच्या बळावर सुवर्णझेप घेतल्याबद्दल अभिनंदन द्युतीचंद... तू या यशाची हकदार असून भारताचा गौरव वाढविला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.