रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे. कदाचित, याच घटेवरुन पत्रकार गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कुस्तीपटू बबिता फोगाटनं निषेध केला. तिनं #IStandWithArnab या हॅशटॅगसह गोस्वामी यांना पाठिंबा दिला.
Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका
पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. याप्रकरणाला अनेकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली. या घटनेमागे कुठलाही धार्मिक रोष नाही, कुणी धार्मिक रंग देऊन राजकारण करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 101 आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नसल्याचे स्पष्ट केले.
Corona Virus : 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र
अर्णब यांनी आपल्या चॅनलवर या संदर्भात वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. त्यातच, मध्यरात्री अर्णब गोस्मावी यांच्या गाडीवर २ अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु आहे.
अर्णब यांच्या समर्थनात राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता आखाड्यात उतरली आहे. ती म्हणाली,''देश बदलला आहे, कोणितरी यांना समजवा. लाठ्या-काठ्यांनी देशाचा आवाज दाबू शकत नाही. घाबरायची गरज नाही, सडेतोड उत्तर द्या.'' #IStandWithArnab
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला
मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला
'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह
CSKनं MS Dhoniची निवड केल्यानं मोठा धक्का बसला; दिनेश कार्तिकनं व्यक्त केली खंत