करमाड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले. हा भीषण अपघात शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.
जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.
या दुर्घटनेवर कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटनं ट्विट केलं आहे. ती म्हणाली,''महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे कामगार बांधवांचा रेल्वे दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची माहिती मिळाली. मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला इश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी मी प्रार्थना करते.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी
शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही
इंग्लंडच्या विश्वविक्रमी फलंदाजाचे निधन; आजही 'तो' विक्रम अबाधित