भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) हंगेरीमध्ये सुरु असलेल्या जागतिक कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप 2021 (2021 World Cadet Wrestling Championships) मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ७५ किलो वजनाच्या महिला गटात हरियाणाच्या प्रिया मलिकने हे यश मिळविले आहे. (Indian Wrestler Priya Malik Wins Gold Medal At 2021 World Cadet Wrestling Championships in Hungary)
प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
एक दिवस आधीच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने (Mirabai Chanu) ने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले होते. प्रिया मलिकने पटकावलेले पदक हे ऑलिम्पिकमधील नसले तरी रेसलिंगच्या जगतातील एका मोठा स्पर्धेतील आहे. यामुळे या तिच्या कामगिरीचे देखील सर्वा स्तरातून कौतुक होत आहे.