brij Bhushan Singh Statement on Wrestlers Protest । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवानांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आज दहाव्या दिवसाअखेर देखील कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. आज पुन्हा एकदा आपल्यावरचे आरोप फेटाळताना सिंह यांनी विनेश फोगाटसह आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. हरयाणात कोणताही विरोध नसून हे फक्त कुटुंबाचे आंदोलन असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
"सुरूवातीला सात ते नऊ ऑलिम्पियन खेळाडू आंदोलनाला बसले होते आणि आता ते फक्त तीन आहेत. कुस्तीपटू त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत नाहीत. आंदोलक त्यांच्या समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जाट समाजाच्या मुलांसाठी लढत आहे. त्यांना (आंदोलकांना) सर्व काही मिळाले आहे आणि ते आता खेळ थांबवत आहेत. मुला-मुलींचे वेगवेगळे कॅम्प लावावेत पण कॅम्प का बंद आहेत? हे फक्त एका कुटुंबाचे आंदोलन आहे, त्यांना सर्वकाही अर्थात पद्मश्री, द्रोणाचार्य अर्जुन अवॉर्ड हे मिळाले आहे. म्हणूनच मी इतरांसाठी लढतो आहे. न्यायपालिका चौकशी करत आहे, ती जी शिक्षा सुनावेल ती मंजूर असेल", अशा शब्दांत ब्रिजभूषण यांनी आंदोलकांवर टीका केली.
आंदोलनाचा दहावा दिवसलक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज मंगळवारी आंदोलनाला दहा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"