शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"ज्या देशात मुलीला देवी म्हटलं जातं तिथं...", उर्मिला मातोंडकरचं कुस्तीपटूंना समर्थन, केलं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:44 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. खरं तर आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने यात उडी घेत सरकारला एक भावनिक आवाहन केले आहे. 

या देशाची, सगळ्यांची मुलगी म्हणून मी आज तुमच्याशी बोलत आहे, अशा शब्दांत उर्मिला मांतोडकरने व्हिडीओच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या मुली आजही आंदोलन करत आहेत. ज्या देशात मुलीला देवी म्हटले जाते तिथेच त्यांना न्यायाची भीक मागावी लागत आहे. महिला पैलवानांसोबत लैगिंक छळ होतोय, मुली आवाज उठवत असून उद्या दुसऱ्या मुलींसोबत अथवा दुसऱ्या क्षेत्रातील महिलांसोबत असे होईल. या मुलींना न्याय मिळायला उशीर झाल्यास वेळ निघून जाईल, अशा शब्दांत अभिनेत्रीने महिला पैलवानांची बाजू मांडली.

उर्मिला मातोंडकरचे कुस्तीपटूंना समर्थन "जेव्हा महिला खेळाडू पदक जिंकतात तेव्हा मंत्री त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी झटतात, जेणेकरून तो फोटो ट्विटरवर टाकता यावा. मीडिया देखील छोट्या बातम्यांना महत्त्व देते पण इथे दुर्लक्ष करत आहेत. या मुलींना न्याय मिळायलाच हवा. देशाचे गृहमंत्री आणि क्रीडामंत्री यांनी आंदोलक पैलवानांना न्याय द्यायला हवा, नाहीतर 'बेटी बचाव'चा नारा देण्यात काही अर्थ नाही", असे उर्मिला मांतोडकरने अधिक म्हटले. 

लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.  प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Wrestlingकुस्तीUrmila Matondkarउर्मिला मातोंडकरVinesh Phogatविनेश फोगटNew Delhiनवी दिल्लीBJPभाजपा