विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:56 PM2024-09-06T15:56:49+5:302024-09-06T16:07:15+5:30

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Wrestlers Vinesh Phogat and Bajrang Punia criticized the BJP as soon as they joined the Congress | विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप

विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप

vinesh phogat news marathi : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचा हात धरत राजकारणात एन्ट्री केली. शुक्रवारी दिल्लीत पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेसने कठीण काळात साथ दिली, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. विनेशने सांगितले की, तुमच्यासोबत कोण आहे हे कठीण काळात समजते. आम्ही रस्त्यावर संघर्ष करत असताना भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी आमची मदत केली. महिलांच्या हिताची गोष्ट बोलली जाते त्या पक्षात मी जात असल्याचा आनंद आहे. आम्ही प्रत्येक पीडित महिलेच्या सोबत आहोत. (vinesh phogat latest news)

तसेच मला आता राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळायची नाही. मी तिथे खेळले आणि जिंकले. मी ट्रायल दिली आणि ऑलिम्पिकला गेले. दुर्दैवाने शेवटी गोष्टी चुकीच्या झाल्या. देवाने मला देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. मी म्हणेन की खेळाडू या नात्याने आम्हाला ज्या गोष्टींना सामोरे जावे लागले ते त्यांना सामोरे जावे लागू नये. बजरंग पुनियावर डोप बंदी घालण्यात आली होती. कारण तो आमच्यासोबत होता, असेही विनेश फोगाटने सांगितले. 

विनेश फोगाट पुढे म्हणाली की, ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धची आमची लढाई अद्याप संपलेली नाही. न्यायालयात प्रकरण सुरू आहे. आम्ही खेळात कधी हार मानली नाही, त्यामुळे इथेही हार मानणार नाही. आम्ही आमच्या लोकांचे चांगले करू. मी माझ्या बहिणींना सांगू इच्छिते की, मी तुमच्यासोबत आहे. काँग्रेस आमच्यासाठी उभी राहिली आणि तुमच्यासाठी देखील उभी राहील, असा दावा विनेशने केला.

बजरंग पुनिया म्हणाला की, आमचा हेतू केवळ राजकारण करणे हा होता असे आज भाजपवाले बोलत आहेत. आम्ही भाजपच्या सर्व महिला खासदारांना पत्र पाठवले होते पण त्यांनी साथ दिली नाही. मात्र, काँग्रेसने न मागता देखील मदत केली. आम्ही शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना आणि खेळाडूंसाठी आंदोलन केले होते. विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर होताच काहींनी जल्लोष सुरू केला. आम्ही आमच्या संघर्षाची लढाई काँग्रेससोबत लढू.

Web Title: Wrestlers Vinesh Phogat and Bajrang Punia criticized the BJP as soon as they joined the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.