कुस्तीच्या दुसर्या दिवशी भारताला चार रौप्य आणि एक कास्यपदक मिळाले. भारताचे चार पहिलवान अंतिम फेरीत पोहोचले होते; परंतु या चारही जणांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सत्यव्रतने ९७, बजरंगने ६१ किलो वजन गटात आणि महिला गटात फ्री स्टाईलमध्ये ललिता (५३ किलो) आणि साक्षी मलिक (५८ किलो) यांनी रौप्यपदक जिंकले. नवज्योत कौरने ६९ किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त केले.कुस्तीच्या तिसर्या आणि अखेरच्या दिवशी ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या योगेश्वर दत्तने ६५ किलो आणि महिला पहिलवान बबिता कुमारी हिने ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले, तर गीतिका जाखडने ६३ किलो वजन गटात रौप्य आणि पवनने ८६ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले.भारतीय मल्लांच्या उल्लेखनीय यशात द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त महाबली सतपाल यांच्या शिष्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारताच्या सात पुरुष पहिलवानांत पाच सतपाल यांचे शिष्य आहेत आणि पाचही जणांनी पदके जिंकली आहेत. त्यात सुशील, योगेश्वर आणि अमितने सुवर्ण जिंकले, तर बजरंगने रौप्य व पवनने कास्यपदक जिंकले.गुरु हनुमान आखाड्याच्या राजीव तोमरने भारतीय संघात आपल्या पुनरागमनाचा आनंद साजरा करताना रौप्यपदक जिंकले. सत्यव्रत कादियानजवळ सुवर्णपदक जिंकण्याचा गोल्डन चान्स होता; परंतु त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.भारतीय महिला पहिलवानांनीही आपला विशेष ठसा उमटवताना दोन सुवर्ण, ३ रौप्य आणि एक कास्यपदक जिंकले. ग्लास्गोत तीन दिवसातील कामगिरीमुळे भारत आठव्या दिवशी पाचव्या स्थानावर पोहोचला. सुशीलने या कामगिरीनंतर पुढेही भारतीय पहिलवान भविष्यात नवी उंची गाठतील, असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
कुस्ती १
By admin | Published: August 01, 2014 10:30 PM