भारतीय कुस्तीपटूंनी केलेले आरोप क्रीडा मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहेत. मंत्रालयाच्या वतीने कुस्ती महासंघाला नोटीस पाठवण्यात आली असून, झालेल्या आरोपांवर 72 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) बुधवारी (18 जानेवारी) रडत रडत, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही हस्तक्षेप करावा अशी मागणीही फोटने केली आहे.
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनासंदर्भात डब्ल्यूएफआयला स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच लावण्या आलेल्या आरोपांवर पुढील 72 तासांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. डब्ल्यूएफआयला पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले आहे, हे प्रकरण अॅथलेटिक्सच्या चांगल्याशीच संबंधित आहे. यामुळेच मंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
उतर दिले नाही, तर होणार कारवाई - मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, जर डब्ल्यूएफआयने पुढील 72 तासांच्या आत उत्तर दिले नाही तर, मंत्रालय राष्ट्रीय खेल विकास संहिता, 2011 तील तरतुदीनुसार, महासंघाविरोधात कारवाई करण्यात येईल. याशिवाय, 18 जानेवारी, 2023 पासून लखनऊमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (एनसीओई) 41 कुस्तीपटू, 13 प्रशिक्ष आणि सहायक कर्मचाऱ्यांसोबत महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबीर सुरू होणार होते. ते आता रद्द करण्यात आले आहे.
विनेश फोगाटने केला असा आरोप -विनेश फोगाट म्हणाली, "ते (युनियन) आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि आमचा छळ करतात. ते आमचे शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. जंतर-मंतरच्या कुस्तीपटूंना हे सांगायचे आहे. तेव्हापासून आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत."