नरेश हाळणोर - नाशिक
गेल्यावेळी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास सज्ज असल्याचे सांगत, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही कुस्तीमध्ये भारताची दावेदारी मजबूत असून त्यादृष्टीने तयारी केल्याचे पहिलवान सुशीलकुमार याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे येत्या बुधवारपासून (दि.23) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाना प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेसाठी 134 खेळाडूंचा भारतीय संघ उद्या (दि.2क्) स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. सदर स्पर्धेसाठी कुस्तीच्या गटामध्ये 7 पुरुष व 7 महिला गटाचा संघ सहभागी झाला आहे. यामध्ये सुशीलकुमार 74 किलो वजनी गटात फ्रि स्टाईल प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
सदर स्पर्धेला जाण्याच्या दोन दिवसआधी सुशिलकुमारने ‘लोकमत’शी संवाद साधला. दिल्लीमध्येच ग्लासगो राष्ट्रकुलसाठीच्या भारतीय संघाचे सराव शिबिरात सुशीलकुमार
सहभागी झाला सध्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदविण्यासाठी मेहनत घेत असल्याचे सांगत तो म्हणाला,
गेल्या वेळी दिल्लीमध्येच राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. त्यावेळी
भारताने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी नोंदविली होती.
विशेषत: कुस्तीमध्ये 19 पदके भारताच्या पहिलवानांनी पटकावले होते. त्याच कामगिरीची अपेक्षा याहीवेळी केली जात असल्याने त्याचे दडपण आहेच. पण कुस्तीमध्ये भारताची दावेदारी मजबूत आहे. योगेश्वर दत्त याने गेल्या काही स्पर्धामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे तर बजरंग, अमितकुमार यांचीही देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी चांगली असल्याने कुस्तीमध्ये सर्वाधिक पदके पटकाविण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
74 किलो वजनी गटात सहभागी होणा:या सुशीलकुमारला कॅनडा, युगांडा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या पहिलवानांकडून कडवी लढत मिळणार असल्याचे सांगत, त्यादृष्टीने तयारी केल्याचे सांगितले. गेल्यावेळीही त्याला कॅनडा आणि पाकिस्तानच्या मल्लांकडूनच कडवी झुंज द्यावी लागली होती.
फक्त फ्रि-स्टाईलच
नवी दिल्ली येथे 2क्1क् मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत ग्रीक रोमन आणि फ्रि स्टाईल या दोन प्रकारात स्पर्धा झाली होती. ग्लासगो राष्ट्रकुलमधून मात्र ग्रीक-रोमनचा प्रकार खेळविला जाणार नाही तर केवळ फ्रि स्टाईलमध्येच मल्लांना झुंजावे लागणार आहे.
असा आहे कुस्ती संघ
पुरुष : सुशीलकुमार, अमितकुमार, बजरंग, योगेश्वर दत्त, पवनकुमार, राजीव तोमर, सत्यव्रत कडीयन
महिला : विनिशा, बबिता कुमारी, ललिता, साक्षी मलिक, गितिका जाखर, नवज्योत कौर,
ज्योती शरथ