ग्लास्गो : ऑलिम्पिकची दोन पदके जिंकणारा सुशील कुमारच्या नेतृत्वात भारतीय मल्लांनी मंगळवारी 2क् व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती प्रकारात सुवर्णाची लयलुट करीत हॅट्ट्रिक साधली. पुरूषांच्या 125 किलो गटात भारताच्या राजीव तोमरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
सुशीलने स्वत: 74 किलो वजन गटात तसेच अमित कुमारने 57 किलो गटात सुवर्ण पटकाविले. महिलांच्या 48 किलो वजन गटात विनेशने तिसरे सुवर्ण जिंकले. अंतिम फेरीत विनेशने इंग्लंडची याना रॅटिगन हिचा 11-8 अशा फरकाने पराभव केला.
बीजिंग ऑलिम्पिकचे कांस्य आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य विजेता सुशीलने सुरुवातीपासूनच लौकिकास्पद कामगिरी करीत सर्वच लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना चारीमुंडय़ा चीत केले. या दिग्गज मल्लाने अंतिम फेरीत पाकचा मल्ल कमर अब्बास याला पहिल्याच फेरीत धूळ चारून सुवर्णावर नाव कोरले. गुरु महाबली सतपाल यांच्या स्टेडियममधील उपस्थितीत सुशीलने पाकच्या मल्लाला उत्कृष्ट डाव मारुन शिताफिने नमविले. एका उत्कृष्ट डावाचा अवलंब करीत सुशीलने अब्बासला एका हाताने वर उचलून मॅटवर थेट चित केले. यामुळे सुशीलला आठ गुण मिळताच लढत पहिल्याच फेरीत संपली. सुशीलचा विजय साकार होताच स्टेडियममध्ये आनंदाला उधाण आले. सर्वत्र इंडिया.., इंडिया.. असा जयघोष दुमदुमला. इकडे रात्री साडेदहाच्या सुमारास टिव्हीवर ही लढत पाहणा:या कोटय़वधी भारतीयांनी आनंद साजरा केला. त्याआधी 2क् वर्षाच्या अमित कुमारने नायजेरियाचा एबिकवेमिनोमो याच्यावर वर्चस्व मिळवित गुणांच्या आधारे बाजी मारली.
वेटलिफ्टिंगमध्ये युवा विकास ठाकूर याने 85 किलो वजन गटात स्नॅच प्रकारात 15क् तसेच क्लिन अॅन्ड जर्कमध्ये 183 किलो वजन उचलण्याची कामगिरी करीत एकूण 333 किलो वजनासह रौप्य पदक जिंकले.
नेमबाजीत हरियाणाचा 33 वर्षाचा हरप्रीतसिंग याने 25 मी. रॅपिड फायर प्रकारात रौप्याचा मान पटकावला. मानवजीतसिंग संधीने ट्रॅप प्रकाराचे कांस्य जिंकले. 5क् मी. रायफल थ्री पोङिाशनमध्ये संजीव राजपूत याने रौप्य पदक जिंकले तर गगन नारंग याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या 5क् मी. रायफल थ्री पोङिाशनमध्ये भारताची लज्जा गोस्वामी ही कांस्य पदकाची मानकरी ठरली. ऑलिम्पिक रौप्य विजेता विजय कुमार याने मात्र घोर निराशा केली. तो 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारातून बाहेर पडला. पुरुष हॉकीतही निराशा पदरी पडली. (वृत्तसंस्था)
महिला हॉकी : भारताकडून त्रिनिदादचा धुव्वा
दीपिका ठाकूर, राणी रामपाल, जसप्रीत कौर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी 3 गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये त्रिनिदाद अॅन्ड टोबॅगो संघाचा 14-क् गोलने धुव्वा उडविला. भारतीय महिला संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत त्रिनिदाद अॅन्ड टोबॅगो संघाच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत 8 खेळाडूंनी एकामागोमाग एक गोल केले. भारताकडून वंदना कटारियाने चौथ्या, दीपिका ठाकूरने 11, 27 व 64 व्या मिनिटाला, राणी रामपालने 12, 19 व 25 व्या मि., जसप्रीत कौरने 18, 41 व 48व्या मि. गोल केले. त्यांच्या रितू राणीने 22, अनुराधा थाकचोमने 31, अनुपा बार्लाने 53 आणि रितुशा आर्याने 68 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला.
ग्लास्गो : भारतीय पुरुष हॉकी संघाला चुरशीच्या झालेल्या पूल ए च्या लढती विश्व विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून 2-4 गोलने पराभवा पत्करावा लागला. भारतीय संघाचा तीन सामन्यांमधील हा पहिला पराभव तर ऑस्ट्रेलिया संघाचा तिसरा विजय आहे. पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया संघ
3-1 गोलने आघाडीवर होता. ऑस्ट्रेलियाकडून क्रिस सिरिएलोने 2 व साईमन ओरकाडने एक गोल केला. भारताकडून फॉरवर्ड रमनदीप व ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंगने प्रत्येकी 1 गोल केला.
4विकास ठाकूरने स्नॅच प्रकारात 15क्, तर क्लिन अॅन्ड जर्कमध्ये 183 किलो, असे एकूण 333 किलो वजन उचलून ही कामगिरी केली.
देश सुवर्ण रौप्य कास्य
ऑस्ट्रेलिया322736
इंग्लंड322627
स्कॉटलंड131क्12
कॅनडा13क्514
भारत101510