शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डिसेंबरमध्ये रंगणार कुस्तीचा विश्वचषक

By admin | Published: August 27, 2016 6:29 AM

यजमानपदाखाली यंदा डिसेंबर महिन्यात पहिल्या खुल्या ‘विश्वविजेता गामा कुस्ती’ विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) यजमानपदाखाली यंदा डिसेंबर महिन्यात पहिल्या खुल्या ‘विश्वविजेता गामा कुस्ती’ विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे भारतातील चार मोठ्या शहरांमध्ये या स्पर्धेचे साखळी सामने होणार असून उपांत्य व अंतिम फेरी दुबईमध्ये खेळविण्यात येईल. जगभरातील ५० देशांच्या मल्लांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी मुंबईत करण्यात आली.कुस्तीची जागतिक संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) मान्यता दिलेल्या या स्पर्धेत ८५ ते १२५ किलो वजनीगटातील जगभरातील आॅलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद विजेते खेळाडू विश्वविजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेबाबत माहिती देताना डब्ल्यूएफआयचे सचिव टी. एन. प्रसूद यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धेतील विजेत्या मल्लाला एक कोटी रुपये, सोन्याचा मुकुट आणि एक किलो वजनाची गदा जिंकण्याची संधी असेल, तर उपविजेत्या मल्लाला ५० लाख रोख रुपयांसह ५ किलोवजनी चांदीची ढाल जिंकण्याची संधी आहे. तसेच, उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.’’ शिवाय, रिओ आॅलिम्पिकदरम्यान गाजलेल्या डोपिंग प्रकरणानंतर या स्पर्धेतही डोपिंग चाचणी करण्यात येणार असून याकडे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे (नाडा) बारीक लक्ष असेल, असेही प्रसूद यांनी स्पष्ट केले. (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धेचे स्वरूप :भारतातील चार शहरांमध्ये बाद पध्दतीने पाच गटात लढती होतील.प्रत्येक गटातील अव्वल २ असे एकूण १० मल्ल साखळी पध्दतीने एकमेकांविरुद्ध लढतील.वर्गीकरण गुणांच्या आधारे अव्वल ४ मल्लांची दुबईसाठी बाद फेरीकरिता निवड.भारतीय मल्लांसाठी स्वतंत्र गट. ‘हिंद-ए-महाबली’ स्पर्धेतून अव्वल २ भारतीयांची निवड. पात्रता फेरी दिल्ली व मुंबईला रंगणार, तर राउंड रॉबिन लढती पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथे होतील.>भारतात पहिल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यावेळी डावीकडून भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव टी. एन. प्रसूद, वस्त्रोद्योगमंत्री अर्जुन खोतकर, अनिरुद्ध धूत, संदीप भोंडवे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे उपस्थित होेते.>नरसिंग, बृजभूषण अनुपस्थितमुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बृहभूषण सराह सिंग आणि डोपिंगमुळे रिओ आॅलिम्पिकला मुकलेला मल्ल नरसिंग यादव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. मात्र, दोघेही अनुपस्थित होते.>ही स्पर्धा महाराष्ट्राच्या मल्लांसाठी मोठी संधी आहे. भारतीय मल्लांच्या गटातून सहभागी होऊन त्यांनी जागतिक स्तरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. - बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र कुस्ती संघटना, सचिव