ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. १ - डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस या जो़डीने स्पेनच्या जोडीचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सानिया - हिंगिस या जोडीचे यंदाच्या वर्षातील हे नववे विजेतेपद आहे.
टेनिसमध्ये ग्रँडस्लॅमनंतर डब्ल्यूटीए ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची सहकारी मार्टिना हिंगिस या जोडीने चमकदार कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सानिया - हिंगिस जोडीसमोर स्पेनच्या गार्बाइन मुरुगुजा आणि कार्ला नुवारो या जोडीचे आव्हान होते. सानिया - हिंगिस जोडीने प्रतिस्पर्धी जोडीचा ६-०, ६-३ असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.