शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

वुसी सिबांडाची चमक

By admin | Published: March 09, 2016 5:16 AM

सलामीवीर वुसी सिबांडाचे (५९ धावा, ४६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतक आणि एल्टन चिगंबुराने ठोकलेल्या झटपट ३० धावांच्या खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेने

किशोर बागडे,  नागपूरसलामीवीर वुसी सिबांडाचे (५९ धावा, ४६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतक आणि एल्टन चिगंबुराने ठोकलेल्या झटपट ३० धावांच्या खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेने तुलनेत अनुभवहीन असलेल्या हाँगकाँग संघाचा टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या पात्रता लढतीत मंगळवारी १४ धावांनी पराभव केला.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेच्या २० षटकांतील ८ बाद १५८ धावांना प्रत्युत्तर देणाऱ्या हाँगकाँगला अखेरच्या २ षटकांत ३० धावांची गरज होती. त्यांचे ६ फलंदाज शिल्लक होते; पण चतारा आणि तिरिपानो यांच्या गोलंदाजीपुढे त्यांचा डाव ६ बाद १४४ असा मर्यादित राहिला. सलामीवीर जेमी अटकिन्सनची झुंज एकाकी ठरली. त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक ५३ धावांचे योगदान दिले. कर्णधार तन्वीर अफझलने १२ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा ठोकल्या; पण संघाचा पराभव त्याला टाळता आला नाही. मार्क चापमन याने १९ आणि अंशुमन रथ याने १३ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून डोनाल्ड तिरिपानो आणि तेंदई चतारा यांनी प्रत्येकी २ तसेच मस्कद्जा व रझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.त्याआधी, युवा हाँगकाँगने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा आणि सिबांडा यांनी डावाला सुरुवात केली; पण मस्कद्जा (२०) तिसऱ्याच षटकात धावबाद झाला. मुतुम्बामीला भोपळाही फोडता आला नाही. हाँगकाँगचा कर्णधार तन्वीर अफझलने त्याला नदीम अहमदकरवी झेलबाद केले. तन्वीरनेच सीन विल्यम्स (१२) याची दांडी गुल करून दुसरा बळी घेतला. सिकंदर रझा (३) धावबाद होताच ८ षटकांत ४ बाद ६२ अशी स्थिती होती. सिबांडाने मात्र एक बाजू सांभाळून पाचव्या गड्यासाठी माल्कम वॉलरसोबत ६१ धावांची भागीदारी करीत डावाला आकार दिला. दरम्यान, सिबांडाने ४० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह अर्धशतकपूर्ण केले. १७व्या षटकांत पहिल्या चेंडूवर वॉलर (२६) बाद झाला. आणखी दोन धावांची भर घालून याच षटकांत सिबांडाही (४६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा) झेलबाद होताच ६ बाद १२५ अशी झिम्बाब्वेची स्थिती झाली. एल्टन चिगंबुराने १३ चेंडूंत ३ षटकारांसह ३० धावा ठोकून झिम्बाब्वेला ८ बाद १५८ अशी मजल गाठून दिली. वुसी सिंबाडा सामन्याचा मानकरी ठरला.> झिम्बाब्वे, हाँगकाँगच्या समर्थकांची हजेरीपात्रता फेरीचा हा सामना पहण्यासाठी झिम्बाब्वे आणि हाँगकाँगच्या पाठीराख्यांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह स्टेडियममध्ये हजेरी लावली. यातील काही जण विशिष्ट पेहरावात आल्याने मैदानात उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. स्थानिक प्रेक्षकांनीदेखील तुरळक गर्दी करून दोन्ही संघांचा उत्साह वाढविला. यंदाच्या विश्वचषकात आयसीसीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ढोलताशांची सोय केली आहे. स्टेडियमच्या आत पब्लिक डीमांडवर ढोल वाजत असल्याने अधूनमधून नृत्य करीत प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटताना दिसले.