शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

इलेव्हन ७७ संघाची आगेकूच कायम

By admin | Published: April 07, 2015 11:24 PM

सलामीवीर मयुरेश नरवणकर याने केलेल्या शानदार ६८ धावांच्या जोरावर इलेव्हन ७७ संघाने कांगा लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील विजयी

मुंबई : सलामीवीर मयुरेश नरवणकर याने केलेल्या शानदार ६८ धावांच्या जोरावर इलेव्हन ७७ संघाने कांगा लीग क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील विजयी घोडदौड कायम राखताना गोमंतक दैवज्ञ सीसी संघाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. गोमंतक संघाने दिलेले २०२ धावांचे लक्ष गाठताना इलेव्हन संघाने ३६.४ षटकांत विजय मिळवला.शिवाजी पार्क येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून इलेव्हन संघाने गोमंतक संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. यावेळी इलेव्हन संघाने अचूक मारा करताना गोमंतकला निर्धारीत ४५ षटकांत ९ बाद २०१ धावांवर रोखले. मलय शाहने ७४ धावांची महत्त्वपुर्ण खेळी करताना संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना इलेव्हन संघाने आक्रमक सुरुवात केली. सौरभ ठाकूर (१४) झटपट बाद झाल्यानंतर मयुरेशने केदार गोखले (२८) सोबत ६३ धावांची भागीदारी करीत संघाला सावरले. केदार बाद झाल्यानंतर आलेल्या प्रकाश गोहिलला देखील माघरी धाडत गोमंतकने सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र यावेळी मयुरेशने सर्व सुत्रे आपल्या हाती घेताना पंकज बंदाबे सोबत निर्णायक ९९ धावांची भागीदारी करीत इलेव्हनचा विजय निश्चित केला. संघाला विजायासाठी ६ धावांची गरज असताना मयुरेशआक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्ना बाद झाला आणि त्यानंतर संदेश धुळेकर व पंकज यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला. मयुरेशने ८८ चेडूत ६ चौकारांसह ६८ धावा फटकावल्या. तर पंकजने ६४ चेंडूमध्ये संयमी नाबाद ३५ धावा काढताना ४ चौकार मारले. (क्रीडा प्रतिनिधी)