अम्मान (जॉर्डन) : येथे झालेल्या ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडताना ७ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची लयलूट केली. संपूर्ण स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखताना भारताने ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य अशी कमाई करीत क्लीन स्वीप नोंदवला.दरम्यान, भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची नोंद झाली असती, मात्र कॅडेट एकेरीअंतिम सामन्यात पायल जैनला तैपईच्या सु पी-सुआन विरुद्ध ४-११, ६-११, ६-११ असा पराभवपत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर कॅडेट गटात सांघिक विजेतेपदानेही भारताला हुलकावणी दिली. पायस, याशांश मलिक आणि चिन्मया सोमैया यांना पराभवास सामोरे जावे लागल्याने भारताचे जेतेपद निसटले.पायसने मोहम्मद अमीन समादीला ११-५, ११-९, १२-१० असे नमवून भारताला मुलांचे एकेरी जेतेपद मिळवून दिले. त्याचवेळी, मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात अनारग्य मंजूनाथ हिने तैपईच्या चेंग पुसुयान हिला ११-७, ६-११, ११-५,१२-१० असा धक्का देत बाजीमारली. (वृत्तसंस्था)
युवा भारतीयांचे एकहाती वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:25 AM