शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

हॉकीसाठी हे वर्ष थोडी खुशी, थोडा गम

By admin | Published: December 24, 2015 11:44 PM

पुरुष आणि हॉकी संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे वर्ष भारतासाठी ‘यादगार’ ठरले असले तरी मैदानाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे हे वर्ष डागाळले गेले आहे

नवी दिल्ली : पुरुष आणि हॉकी संघाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे वर्ष भारतासाठी ‘यादगार’ ठरले असले तरी मैदानाबाहेर घडलेल्या काही घटनांमुळे हे वर्ष डागाळले गेले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिक वर्तुळात प्रवेश केला, तर पुरुष संघाने वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये कांस्यपदक मिळवून भारतीय संघाने ३३ वर्षानंतर यशाची चव चाखली. या दोन ऐतिहासिक घटनांमुळे हे वर्ष भारतीय हॉकीसाठी संस्मरणीय ठरले असतानाच प्रशिक्षक वॉन एस. पॉल यांची गच्छंती आणि गुरुबाज सिंगवरील ९ महिन्यांची बंदी या दोन घटना चटका लावणाऱ्या ठरल्या.२०१५ची आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुरुवात अझलन शाह हॉकी स्पर्धेने झाली. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने तिसरे स्थान मिळविले. जानेवारीमध्ये नियुक्त केलेल्या वॉन एस. पॉल यांचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा होता. यानंतर भारतीय संघ बेल्जियममधील अँटवर्प येथे झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग (डब्ल्यूएचएल) सेमीफायनलमध्ये सहभागी झाला. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी संमिश्र झाली. स्पर्धेत त्यांचा ब्रिटनकडून पराभूत होवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हे थोडेफार मिळालेले यश पदरी घेवून संघ मायदेशी परतला. पण त्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि कोच वॉन पॉल यांच्यात बेबनाव झाला. त्यामुळे सहा महिन्यांतच त्यांना हे पद सोडावे लागले. यानंतर हाय परफॉर्मस डायरेक्टर रोलँट ओल्टमॅन्स यांना २०१६ रियो आॅलिम्पिकपर्यंत पुरुष संघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरदार सिंगच्या नेतृत्त्वाखाली १५ दिवसांच्या युरोपियन दौऱ्यावर रवाना झाली.या दौऱ्यात भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत २-० ने तर स्पेनला चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने हरविले. दरम्यान, मिडफिल्डर गुरबाज सिंगला गैरवर्तणुकीच्या आरोपावरून संघातून बाहेर करण्यात आले. संघात गटबाजी केल्याच्या आरोपावरून हॉकी इंडियाने त्यांना ९ महिन्यांसाठी निलंबित केले. याविरुद्ध गुरबाजने न्यायालयात धाव घेतली. तेथून त्याने निलंबन मागे घेण्यात यश मिळविले; परंतु तोपर्यंत त्याचे व्हायचे ते नुकसान झाले होते. त्याला एआयएलच्या लिलावात भाग घेता आले नाही आणि राष्ट्रीय निवड समितीनेही त्याला दुर्लक्षित केले.ओल्टमॅन्स यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी सुरूच ठेवली. या यशावर ताज चढविला तो डब्ल्यूएचएलच्या कांस्यपदकाने. साखळी फेरीत संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती, परंतु कांस्यपदकाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध २-१ असे पिछाडीवर पडल्यानंतरही कांस्यपदक जिंकले. डब्ल्यूएचएलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने ३३ वर्षांनतर हे पदक मिळविले. (वृत्तसंस्था)महिला संघाचे ऐतिहासिक यशभारतीय महिला हॉकी संघ २०१६च्या रियो आॅलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या युरो हॉकी चॅम्पियनशीपमध्ये फायनलमध्ये पोहोचल्यामुळे भारताने आॅलिम्पिक पात्रता मिळविली. वर्ल्ड हॉकी लीगमध्येही त्यांनी पाचवे स्थान मिळवित आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. यापूर्वी भारताने १९८० मध्ये मॉस्को आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ३६ वर्षांनी भारताला हे यश मिळाले.