शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

युवा सायकलपटूंनी खडतर मेहनत घ्यावी - परमजीत सिंग बुमराह

By admin | Published: July 18, 2016 10:29 PM

पुर्वीच्यातुलनेत भारतात सायकलिंगमध्ये काहीच बदल झालेला नाही. मात्र, पुर्वी खेळाडू मेहनतीवर अधिक लक्ष द्यायचे, तर आज सायकलवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळेच युवा

- रोहित नाईक

मुंबई, दि. १८ - पुर्वीच्यातुलनेत भारतात सायकलिंगमध्ये काहीच बदल झालेला नाही. मात्र, पुर्वी खेळाडू मेहनतीवर अधिक लक्ष द्यायचे, तर आज सायकलवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळेच युवा सायकलपटूंनी खडतर मेहनत घ्यावी. कारण त्यांच्यापुढे सायकलिंगसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, असा सल्ला भारताचे माजी दिग्गज सायकलपटू परमजीत सिंग बुमराह यांनी दिला. नुकताच अंधेरी येथे राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी ह्यस्कॉट टीम बाइक शार्कह्ण संघाची घोषणा झाली. या संघाचे प्रशिक्षक असलेले परमजीत यांनी यावेळी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला. एकूण सहा सायकलपटूंचा समावेश असलेल्या या संघात अरुण राजपूरोहित, धीरेन बोंत्रा, मेहेरझाद इराणी, अक्षय मोये, आदित्य जैन आणि सोहिल मुलानी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आदित्य या मणिपूरच्या सायकलपटूचा अपवाद वगळत उर्वरीत सर्वजण महाराष्ट्राचे खेळाडू आहेत.परमजीत हे मुळात वेटलिफ्टींग खेळाडू असून त्यांनी १९८८ साली राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर वयाच्या ३०व्या वर्षी त्यांनी तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा पर्याय निवडून राष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. राष्ट्रीय शर्यतीत दोन कांस्य पटकावताना देशातील सर्वात खडतर मुंबई - पुणे शर्यतीमध्ये परमजीत यांनी पाचवेळा अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. परमजीत म्हणाले की, ह्यह्यदेशात सायकलिंग वाढली आहे, मात्र त्याचा स्तर वाढला नाही. स्पर्धात्मक सायकलिंगची आपल्याकडे कमतरता असून ती वाढवणे गरजेचे आहे. सध्या काही प्रमाणात लोकांना सायकलिंगचे महत्त्व कळाले आहे, मात्र योग्य प्रायोजक मिळणेही तेवढेच गरजेचे आहे. हे सर्व झाले, तर नक्कीच स्पर्धात्मक सायकलिंगला प्रोत्साहन मिळेल.संघाविषयी परमजीत यांनी सांगितले की, ह्यह्यआगामी राष्ट्रीय शर्यतींंमध्ये संघातील जास्तीत जास्त खेळाडू पोडियमवर कसे पोहचतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत. केवळ एकाच खेळाडूकडे लक्ष न देता संघातील प्रत्येक खेळाडूला पोडियमवर नेण्याचे उद्दिष्ट्य आहे.अरुण राजपुरोहित -मालाडच्या दालमिया कॉलेजमधून पदवीधर. एका शर्यतीत परमजीत यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ शर्यतीपैकी २० शर्यती जिंकल्या आहेत. त्यात राष्ट्रीय व राज्य शर्यतींचा समावेश. यंदाची मुंबई चॅम्पियनशीपमध्येही सांघिक बाजी. राष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे लक्ष्य.धीरेन बोंत्रा -कॉलेज फुटबॉलनंतर सायकलिंगकडे वळाला. कॉलेजसाठी बाईक मिळाल्यानंतरही सायकलसह मैत्री केली. एका शर्यतीदरम्यान परमजीत यांच्याशी ओळख. दिडवर्षांपासूंन २८ पैकी १८ शर्यतीत वर्चस्व. तर इतर शर्यतींमध्ये पोडियम फिनिश. फास्टेट इंडियनचे लक्ष्य.......................................मेहरझाद इराणी -डहाणूसारख्या लहानश्या शहरातील मेहरझाद तीन वर्षांपासून सायकल शर्यत खेळतो. सरावासाठी रोज मुंबईत अप-डाऊन. जळगावहून केमिकल इंजिनियरींगचे शिक्षण घेतल्यानंतर ४-५ शर्यतीत सहभाग. यंदाच्या मुंबई चॅम्पियनशीपमध्ये द्वितीय, ठाणे शर्यतीत चौथा क्रमांक तर बांद्रा शर्यतीत तिसरे स्थान. डहाणूला चारोटी नाक्यावरुन अहमदाबाद हायवेवर सराव. मुंबई - पुणे शर्यत जिंकण्याचे प्रमुख लक्ष्य.अक्षय मोये -मुंबई विद्यापीठातून पदवीधर. २०१२ पासून व्यावसायिक सायकलिंगला सुरुवात. स्थानिक शर्यतींपासून एकूण ५ राष्ट्रीय शर्यतींचा अनुभव. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून एकूण ३००हून अधिक शर्यतींचा अनुभव. त्यात जवळपास ५० शर्यती जिंकल्या. २०१२ मध्ये मुंबई - पुणे शर्यतीत अव्वल २० मध्ये स्थान. आंतरराष्ट्रीय शर्यतीचे लक्ष्य.आदित्य जैन -इम्फाळ, मणिपूरचा हा खेळाडू शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर व्यावसायिक सायकलपटू म्हणून दोन वर्ष झाली. आतापर्यंत सुमारे १२-१५ शर्यतींचा अनुभव. दोन रेस जिंकल्या आहेत. जास्तीत जास्त शर्यती जिंकण्याचे लक्ष्य.सोहेल मुलानी - पक्का मुंबईकर असलेल्या सोहेलने रुईयामध्ये अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर जॉबमुळे मुंबई विद्यापिठातून पदवी मिळवली. युनिव्हर्सिटी नॅशनल व कुरुक्षेत्र नॅशनल रेसचा अनुभव. बीएमसीमध्ये लाइफ गार्ड म्हणून नोकरी करत असलेल्या सोहेलकडे ३०-४० शर्यतींचा अनुभव त्यापैकी अनेक पोडियम फिनिश आहेत. महाराष्ट्र संघटनेच्या वतीने झालेल्या पाच दिवसांची स्टेज रेस पुर्ण करण्याचा पराक्रम. मुंबई-पुणे शर्यत ह्यघाटाचा राजाह्णमध्ये अनेकदा अव्वल १०मध्ये स्थान.