मीरपूर : भारतीय युवा संघाची नजर चौथ्यांदा आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकपचे जेतेपद मिळविण्यावर आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ फायनलमध्ये रविवारी (दि. १४) वेस्ट इंडीज युवा संघाचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे युवा संघाने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील भारतीय युवा संघ पाचव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन साखळी सामन्यांत संघाने अंतिम फेरीत मजल मारली आहे. त्यामुळे या लढतीत भारतीय संघाची बाजू वरचढ मानली जात आहे. भारतीय संघाने यापूर्वी २०१२, २००० आणि २००८ मध्ये स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. वेस्ट इंडीजने वर्ल्डकपच्या साखळी सामन्यांत बाद फेरीत जागा मिळविली होती. त्यानंतर या संघाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान बांगलादेशला धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला होता. संघ यातून निवडणारभारत : इशान किशन (कर्णधार), ऋषभ पंत, खलील अहमद, जीशान अन्सारी, राहुल बैथम, रिकी भुई, मयंक डागर, अरमान जाफर, सर्फराज खान, अमनदीप खरे, अवेश खान, महिपाल लोमरोर, शुभम मावी, अनमोलप्रीत सिंह, वॉशिंग्टन सुंदर.वेस्ट इंडीज : शिमरोन हेटमेयर (कर्णधार), शाहिद क्रुक्स, किसी कॉर्टी, मायकल फ्रू, जिड गुली, चेमार होल्डर, टेविन इमलॉक, अलजारी जोसेफ, रेयान जॉन, कर्स्टन कालिचरण, ग्रिड्रोन पोपे, कीमो पॉल, ओडियन स्मिथ, शमर स्प्रिंगर, इमानुएल स्टीवर्ट.
युवा इंडियाची नजर चौथ्या विजेतेपदावर
By admin | Published: February 13, 2016 11:36 PM