शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

राणासारखे युवा खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य!

By admin | Published: April 21, 2017 11:35 PM

मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार!

रवि शास्त्री लिहितात...मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार! पांड्या आणि राणा; नायर आणि अय्यर या खेळाडूंनी स्वत:च्या कामगिरीमुळे कमालीची लोकप्रियता कमावली आहे. ऋषभ पंत हा आणखी एक चांगला खेळाडू. या सर्व खेळाडूंमध्ये राणाला स्वत:ची ओळख सांगण्याची वेळ राहिलेली नाही. शिवाय या खेळाडूंना कुठल्याही संघाविरुद्ध कामगिरी उंचावण्यास वेळ लागणार नाही. राणाची चमक तर कुणाच्याही ध्यानीमनी नव्हती. तो धडाका करेल, असे कुणी भाकितही केले नव्हते. मुंबई इंडियन्सच्या बाकावर बसणारा हा युुवा खेळाडू आता संघाच्या चाव्या सांभाळायला लागला आहे. प्रत्येकाचा विश्वास त्याने कमावला आहे. मैदानात असेल तेव्हा प्रत्येक क्षणाला वर्चस्व गाजवितो. २०१७ चे आयपीएल सत्र माझे आहे, असा जणू काही तो इशाराच देत आहे.राणा हा गोलंदाजांसाठी ‘कोडे’ ठरलेला फलंदाज आहे. त्याला चेंडू कसा टाकावा, हे देखील अनेकांना समजत नसावे. त्याच्या हातात वेग आणि मनगटात ताकद असल्याने वेगाने बॅट फिरविण्यात तरबेज वाटतो. सध्याच्या पर्वात त्याच्यापेक्षा जास्त षट्कार कुणी मारले नसावते, यावरून राणाची फटकेबाजी लक्षात येते. राणा मुंबईसाठी जी कामगिरी करू शकतो तशीच कामगिरी दिल्लीसाठी श्रेयस अय्यर हा देखील करू शकतो. दोघेही सारख्याच वयाचे आहेत. या स्पर्धेत युवा खेळाडू सर्वाधिक जोखीम पत्करून खेळतात. त्यात दिल्ली आणि मुंबई संघात युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आहे; पण या युवा खेळाडूंनी सावध खेळ करायलाच हवा. जोखीम पत्करण्याच्या नावाखाली चुका करू नये. पंतने हैदराबादविरुद्ध मोठी चूक करीत युवराजच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरकडे सोपा झेल दिला होता. पांड्या बंधू आणि ऋषभ पंत हे क्रिकेटचे भविष्यातील ब्रँड बनू शकतात. याच मालिकेत संजू सॅमसन याला विसरता येणार नाही. २३ वर्षांच्या या खेळाडूने आयपीएलचे पहिले शतक ठोकले. करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे देखील या खेळातील स्वमर्जीचे मालक आहेत. यामुळेच माझ्या मते वानखेडे स्टेडियमवर भारतीय टी-२० क्रिकेटचे भविष्य आपापले कौशल्य पणाला लावताना दिसणार आहे. (टीसीएम)