यंग मुस्लीमची अ.भा. फुटबॉल स्पर्धा उद्यापासून विजेत्यांना दीड लाखाचे पारितोषिक : देशभरातील १६ संघांचा सहभाग
By admin | Published: January 30, 2016 12:17 AM
नागपूर : शताब्दी साजरी करणाऱ्या मोमीनपुऱ्यातील यंग मुस्लीम फुटबॉल क्लबच्यावतीने अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारपासून होत आहे. मोतीबाग येथील दपूम रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत १६ संघांचा समावेश राहील. विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार तर उपविजेत्या संघास १ लाख ११ हजार १०१ रुपयांचा पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा माजी महापौर अटलबहादूरस्िंाग यांनी पत्रकार परिषदेत केली.
नागपूर : शताब्दी साजरी करणाऱ्या मोमीनपुऱ्यातील यंग मुस्लीम फुटबॉल क्लबच्यावतीने अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारपासून होत आहे. मोतीबाग येथील दपूम रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत १६ संघांचा समावेश राहील. विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार तर उपविजेत्या संघास १ लाख ११ हजार १०१ रुपयांचा पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा माजी महापौर अटलबहादूरस्िंाग यांनी पत्रकार परिषदेत केली.या स्पर्धेत एअर इंडिया, ओएनजीसी, डीएसके शिवाजी, कालिघाट कोलकाता, आर्मी इलेव्हन, नागपूर फुटबॉल क्लब आणि यजमान यंग मुस्लीम क्लब हे सात संघ मुख्य फेरीत खेळतील. याशिवाय एक संघ पात्रता फेरीतून येईल. पात्रता फेरीत दपूम रेल्वे, रब्बानी क्लब, राहुल क्लब, सिटी क्लब, किदवई क्लब, एसआरपीएफ हिंगणा, न्यू ग्लोब, आणि सिटी क्लब यांचा समावेश आहे. सुरुवातीला पात्रता सामने खेळविण्यात येतील. मुख्य फेरीतील आठ संघांची विभागणी दोन गटात करण्यात येईल. प्रत्येक संघाला तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेत सवार्ेत्कृष्ट ठरणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट, अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला गोल्डन बॉल, आणि उत्कृष्ट गोलकिपरला सिल्व्हर ग्लोव्हज दिले जातील. स्पर्धेचे उद्घाटन माजी खा. दत्ता मेघे हे करतील. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रश्ेाखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, माजी खा. विलास मुत्तेमवार, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित राहील. स्पर्धेसाठी मेघे कुटुंबीयांनी पाच लाखाची देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे चेअरमन आ. समीर मेघे, अध्यक्ष कामिल अन्सारी, क्लबचे उपाध्यक्ष असद जमाल, सचिव जुल्फिकार अहमद, सहसचिव अहमद शाहीद, माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अब्दुल खालिक, अहमद जावेद व ईशाद अहमद आदींची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)...........................