- रवी शास्त्री - एक वेळ अशी होती की ऋषभ पंत प्रत्येक चेंडूवर षट्कार मारण्यास इच्छुक होता. कॅरेबियन स्टाईलने तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगमागेही स्कूप करताना तर कधी आॅफ साईडवर षट्कार खेचताना दिसला. यातील कुठलाही फटका कमकुवत नव्हता. जेम्स फॉल्कनरने हळुवार टाकलेला चेंडू आधीच समजून घेतला होता. त्याची खेळी इतकी शानदार ठरली की, सचिन तेंडुलकरला देखील आयपीएल-१० मधील सर्वोत्कृष्ट खेळी, असे संबोधावे लागले.१९-२० वर्षांच्या अन्य खेळाडूंसारखाच पंत देखील कुणाची पर्वा करीत नाही. वडिलांच्या निधनाचे दु:ख त्याने पचविले. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा दर्जा काय याचीही त्याने तमा बाळगली नाही. २७ वर्षांच्या प्रगल्भ फॉल्कनरलाही त्याने आपल्या बॅटने पाणी पाजले. मनगटाला वळवून त्याने षट्कार खेचले. तो तासभर खेळपट्टीवर स्थिरावला तरी प्रेक्षकांसाठी ही वेळ अविस्मरणीय ठरेल, हे नक्की. ऋषभने रणजित सर्वांत वेगवान शतक ठोकले आहे. महाराष्ट्र संघाविरुद्ध देखील त्याने त्रिशतकी खेळी केली. याच बळावर त्याने भारतीय संघात स्थान पटकविले. १९ वर्षे गटाच्या विश्वचषकापासून राहुल द्रविडने त्याला सोबत ठेवले आहे.पंतच्या तुलनेत २२ वर्षांचा संजू सॅमसन थोडा अनुभवी वाटतो; पण फलंदाजी आणि यष्टिरक्षणात तो देखील दमदार आहे. वेगवान गोलंदाजापुढे स्वमर्जीने फटके मारण्यात संजू पटाईत आहे. षट्कार तर तो सहजपणे मारतो. त्यामुळेच आयपीएलमध्ये संजू आणि पंतच्या षट्कारांची संख्या सारखीच आहे. या दोन्ही युवा खेळाडूंनी दिल्लीच्या मरणासन्न अवस्थेला नवसंजीवनी दिली. उर्वरित तिन्ही सामने दिल्लीला घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. काहीही घडणे शक्य असल्याने विजयाचा आनंद सध्यातरी साजरा होऊ नये. दिल्लीचे युवा खेळाडू धडाका करीत आहेत, यात शंका नाही. त्यांच्या कामगिरीकडे डोळेझाक होणे शक्यच नाही. (टीसीएम)
युवा खेळाडूंमुळे दिल्लीच्या ‘प्ले आॅफ’च्या आशा पल्लवित
By admin | Published: May 06, 2017 12:42 AM